शाळेतील गणवेश चोरांवर होणार कारवाई

जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात झालेल्या गणवेश घोटाळा प्रकरणातल्या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेनं घेतला आहे. हा गणवेश घोटाळा लाखो रुपयांचा आहे.

Updated: May 9, 2012, 04:50 PM IST

www.24taas.com, जळगाव

जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात झालेल्या गणवेश घोटाळा प्रकरणातल्या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेनं घेतला आहे. हा गणवेश घोटाळा लाखो रुपयांचा आहे.

या घोटाळ्याच्या चौकशीअंती ४७१ शाळा दोषी आढळल्या असुन गटशिक्षण अधिकाऱ्यांसह मुख्याध्यापकांवर फौजदारी कारवाई होणार आहे. शासनाच्या सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ९ हजार ९५७ विद्यार्थ्यांसाठी साधारण साडेतीन कोटी रुपये किंमतीचे गणवेश वाटप करण्यात आलं.

खरंतर मुख्याध्यापकांनी गणवेशाचं कापड आणून बचतगटांकडुन ते शिवून घेण्याचं ठरलं होतं मात्र तसं न करता निकृष्ट दर्जाचे गणवेश आणले गेले आणि त्याचं वाटप केलं गेलं. यासंदर्भात चौकशीअंती ४७१ शाळा दोषी आढळल्या. यासंदर्भात जिल्हा परिषदेनं कारवाईचे संकेत दिले आहेत.