अंबजोगाई मंदिरातून ३५ तोळे सोने चोरीला!

आराध्य दैवत आणि साडे तीन शक्तीपीठांपैकी एक उपपीठ समजल्या जाणा-या अंबेजोगाईच्या योगेश्वरी मंदिरात चोरी झालीय. ३५ तोळे सोनं आणि देवीच्या चांदीच्या पादुका चोरीला गेले आहेत.

Updated: Apr 18, 2012, 08:36 PM IST

www.24taas.com, बीड

आराध्य दैवत आणि साडे तीन शक्तीपीठांपैकी एक उपपीठ समजल्या जाणा-या अंबेजोगाईच्या योगेश्वरी मंदिरात चोरी झालीय. ३५ तोळे सोनं आणि देवीच्या चांदीच्या पादुका चोरीला गेले आहेत. दिवेआगार येथील सुवर्णमंदिरातील चोरीनंतर ही सर्वात मोठी चोरी असल्याने राज्यातील देवस्थानने असुरक्षित असल्याची सध्या सुरू आहे.

 

 

साधारण एक ते दीड कोटीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय. मध्यरात्री अडीच वाजता ही चोरी झाल्याचा अंदाज आहे. मंदिराचे चार दरवाजे तोडून चोर मंदिरात घुसले. देवीचे सोन्याचे डोळे, सोन्याचे कान, चंद्रकोर, पिंपळपान हे सगळंच चोरुन नेण्यात आलंय.

 

 

तसंच देवीचे अतिशय पुरातन आणि दुर्मिळ असे केवदा, मासळी, छत्री असे चांदीचे दागिनेही चोरट्यांनी चोरलेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय. दिवेआगारनंतर या मंदिरात चोरी झाल्यानं एकच खळबळ उडालीय.