अडवाणींची रथयात्रा पुण्यात, गटबाजीचे प्रदर्शन

अडवाणींची रथयात्रा आज पुण्यात येतेय. मात्र, यानिमित्तानं पुणे भाजपातील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे

Updated: Nov 3, 2011, 02:39 AM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे

 

अडवाणींची रथयात्रा आज पुण्यात येतेय. मात्र, यानिमित्तानं पुणे भाजपातील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

 

पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अडवाणींची आज जाहीर सभा होणार आहे. त्यापूर्वी अडवाणींच्या स्वागतासाठी शहरात जय्यत तयारी सुरू करण्यात आलीये. अडवाणींची रथयात्र खडकवासला मंतदारसंघातून प्रवेश करत असल्यानं गडकरी गटाचे समजले जात असलेले नवनिर्माचित आमदार भीमराव तापकीर तसंच शहराध्यक्ष विकास मठकरी कात्रज चौकात रथयात्रेचं स्वागत करणारेत. तर दुसरीकडे मुंडे गटाकडूनही स्वागताची स्वतंत्रपणे जय्यत तयारी करण्यात आली आहे.

 

पर्वती मतदारसंघात प्रवेश करताना मुंडे गटाच्या आमदार माधुरी मिसाळ यात्रेचं स्वागत करणार आहेत. थोडक्यात, मुंडे आणि गडकरी गटाकडून अडवाणींच्या रथयात्रेचं स्वतंत्रपणे स्वागत करण्यात येणार असल्याने शहरातल्या गटबाजीची चर्चा पुन्हा  रंगलीयली आहे.