झी २४ तास वेब टीम, चेन्नई
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजचा दिल्ली दौरा रद्द केला आहे. आता ते चेन्नईहून दुपारी पुणेमार्गे राळेगणला जाणार आहेत. अण्णांचा तीन ते चार दिवस राळेगणध्येच राहणार आहेत. अण्णांचे स्वीय सहाय्यक सुरेश पठारे यांनी ही माहिती दिली आहे.
अण्णा संसदेच्या प्रेक्षक गॅलरीत लोकपाल विधेयकावरची चर्चा ऐकण्यासाठी उपस्थित राहणार होते. लोकपाल विधेयकाला सरकार अंतिम रुप देत आहे. ते उद्या संसदेत येण्याची शक्यता वर्तवली जाते होती. मात्र नेमकं हे विधेयक उद्या चर्चेला येणार काय हेही निश्चित नाही. त्यामुळं अण्णांनी राळेगणला परतण्याचा निर्णय घेतला. अण्णा आज चेन्नईहून नवी दिल्लीकडे निघणार होते .
मात्र त्यांच्या कार्यक्रमात अचानक काही बदल करण्यात आला असून अण्णा पहिले पुण्याला निघाले आहेत . तेथून ते राळेगणमध्ये जातील . तीन ते चार दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर ते नवी दिल्लीला जातील अशी माहिती सुरेश पाठारे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे .