www.24taas.com, पुणे
पुण्यात एका अनोख्या कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही कार रॅली होती अंध व्य़क्तींची. या रॅलीत अंध व्यक्तींनी स्वतः कार चालवली नाही. मात्र अंध व्यक्तींच्या सूचनेनुसारच ड्रायव्हर कार चालवत होते.
ब्रेल लिपीच्या सहाय्याने गाडीचा वेग, ती कोणत्या दिशेला वळवावी यासारख्य़ा सूचना ते ड्रायव्हरला देत होते. या रॅलीमध्ये ९६ अंध व्यक्तींनी सहभाग घेतला होता. ६५ किलोमीटरचे अंतर ठराविक वेळेत पूर्ण करण्याचं आव्हान या स्पर्धांपुढे होतं.
नगर रोडवरुन सकाळी साडेसातच्या सुमारास या रॅलीला सुरुवात झाली. ग्रामीण भागातल्या वंचित कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. या अनोख्या रॅलीची नोंद घेण्यासाठी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारीही उपस्थित होते.