आयुक्तांना धमकी, अजितदादांना आव्हान?

पिंपरी चिंचवडमध्ये आयुक्त श्रीकर परदेसी यांना जीवे मारण्याची धमकी देणार पत्र मिळाल्यामुळ एकाच खळबळ उडाली असली तरी आता या मुद्द्यावर राजकीय रंग चढू लागले आहेत. ही धमकी जरी आयुक्तांना असली तरी अप्रत्यक्षपणे हे आव्हान दादांनाच असल्याची चर्चा आहे.

Updated: Jul 22, 2012, 06:37 PM IST

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड

 

पिंपरी चिंचवडमध्ये आयुक्त श्रीकर परदेसी यांना जीवे मारण्याची धमकी देणार पत्र मिळाल्यामुळ एकाच खळबळ उडाली असली तरी आता या मुद्द्यावर राजकीय रंग चढू लागले आहेत. ही धमकी जरी आयुक्तांना असली तरी अप्रत्यक्षपणे हे आव्हान दादांनाच असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा दादांच्या भूमिकेकडे लागल्या आहेत.

 

पिंपरीत एक हाती सत्ता असल्यामुळे अतिक्रमविरोधी कारवाई होणारच हे सूचित केल्यानंतर पिंपरीत नव्यानेच दाखल झालेले आयुक्त श्रीकर परदेसी यांनी अतिक्रमणविरोधी कारवाई आणखीन तीव्र केली. परंतु त्यांच्या याच कारवाईमुळं त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेबद्दल आयुक्त काही बोलत नसले तरी कारवाई सुरू राहणार असल्याचं स्पष्टीकरण आयुक्तांनी दिलंय.

 

ज्या पिंपरीत अजित पवार यांच्या आदेशाशिवाय प्रशासन असो वा नेत्यांचं पानही हालत नाही तिथे अतिक्रमण विरोधी कारवाई दादांच्या आदेशावरूनच सुरु असल्याचं आता स्पष्ट झालंय. त्यामुळ विरोधी पक्ष दादांवर जोरदार टीका करत आहेत.

 

बारामतीनंतर अजित पवार यांची एकहाती पकड पिंपरी चिंचवडवर आहे. हेच शहर दादांना संपूर्ण महाराष्ट्रात रोल मॉडेल म्हणून दाखवायचं आहे. त्यासाठी अजितदादा इथं विकासासाठी जनतेची नाराजीही ओढवून घ्यायलाही तयार आहेत. याच पार्श्वभूमीवर आयुक्त श्रीकर परदेसी यांना मिळालेली धमकी अप्रत्यक्षरित्या दादांना आव्हान देणारी आहे.