www.24taas.com, पुणे
अभिनेत्री माधुरी दीक्षित आज होणा-या या रक्तदान शिबिराला उपस्थित आहे. यापूर्वी राज्य सरकारचा पुरस्कार स्वीकारायला माधुरी आली नव्हती तेव्हा अजित पवार यांनी भाषणात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर माधुरीने चक्क उपस्थिती लावली आहे. तर या आधी माधुरी मीडियावर घसरली होती. 'नॉनसेन्स' असा उल्लेख केला होता.
खासगी कार्यक्रमांना उपस्थिती लावणारे कलाकार सरकारचा पुरस्कार स्वीकारायला येत नाहीत हे वागणं बरं नव्हं अशा शब्दांत अजितदादांनी खडसावलं होतं. आज पुण्यात अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या खासगी कार्यक्रमाला मात्र उपस्थित आहे. राज कपूर पुरस्कार स्विकारण्यास माधुरी दीक्षित गैरहजर होती त्याबद्दल तिच्यावर अनेक ताशेरे ओढले गेले.
माधुरीने याबद्दल ट्विटरवर प्रतिक्रिया दिलीय. फक्त एक आठवड्यापूर्वी मला पुरस्कार सोहळ्याबद्दल कळवण्यात आलं होतं. त्यामुळे इतर नियोजित कार्यक्रम असल्याने राज कपूर पुरस्कार सोहळ्याला मी उपस्थित राहू शकले नाही. माझे ९० वर्षीय वडील मात्र स्वतः या सोहळ्याला आले होते, हे विसरून कसं चालेल. सत्य काय तेच प्रसिद्ध करा. नॉनसेन्स नको, अशा शब्दात माधुरीने मीडीयालाही टिकेचं लक्ष बनवलं. मी महाराष्ट्रीय मुलगी आहे आणि मला याचा सार्थ अभिमान आहे, असंही माधुरीने ट्विटरवर म्हटले आहे.
नागरिकांचा का आहे विरोध?
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त आज पुण्याच्या संभाजी उद्यानात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. मात्र याठिकाणी फिरायला येणा-या नागरिकांनी उद्यानाचा वापर कार्यक्रमासाठी करण्यास विरोध दर्शवलाय.
मागील वर्षी देखील या बागेत रक्तदान शिबाराच आयोजन करण्यात आलं होत. त्यावेळी बागेचं मोठं नुकसान झालं होता तसेच नागरिकांची फिरण्याची देखील अडचण झाली होती. त्यामुळे असे कार्यक्रम इतर मैदानावर घ्यावेत, बागा ह्या नागरिकांसाठीच असाव्यात असं निवेदन नागरिकांतर्फे महापालिकेला देण्यात आलं आहे.