दर्दी पुणेकरांना मराठी चित्रपट मेजवानी

पुण्यातल्या चित्रपट रसिकांना पुढच्या महिन्यात अनोखी मेजवानी मिळणार आहे. दर्जेदार शंभर मराठी चित्रपट पुण्यातल्या थिएटर्समध्ये दाखवले जाणार आहेत. ११ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान हा चित्रपट महोत्सव सुरू राहणार आहे.

Updated: Jul 31, 2012, 04:15 PM IST

www.24taas.com, पुणे

पुण्यातल्या चित्रपट रसिकांना पुढच्या महिन्यात अनोखी मेजवानी मिळणार आहे. दर्जेदार शंभर मराठी चित्रपट पुण्यातल्या थिएटर्समध्ये दाखवले जाणार आहेत. ११ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान हा चित्रपट महोत्सव सुरू राहणार आहे.

राजा हरिश्चंद्रापासून ते काकस्पर्शपर्यंतचे शंभर दर्जेदार चित्रपट पाहण्याची पर्वणी पुणेकरांना मिळणार आहे. ‘अखिल भारतीय चित्रपट महामंडळ’ आणि ‘झी टॉकीज’च्या सहकार्यानं या चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. येत्या 11 ऑगस्टला या महोत्सवाचं उदघाटन होणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी दिलीय.

पुण्यातल्या सहा चित्रपटगृहांमध्ये ११ ते १४ ऑगस्ट दरम्यान हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. या महोत्सवासाठी तिकीट असेल फक्त २०० रुपये. भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त पुण्याच्या दर्दी रसिकांना ही दर्जेदार भेट मिळणार आहे. पुण्यातील रसिक प्रेक्षकही या चित्रपट महोत्सवाची आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत.

.