दहावी, बारावी परीक्षेचे टाईमटेबल जाहीर

महाराष्ट्र राज्यात घेण्यात येणाऱ्या १० आणि १२ वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा एक मार्चला तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून होणार आहे.

Updated: Feb 7, 2012, 01:02 PM IST

www.24taas.com, पुणे

 

महाराष्ट्र राज्यात घेण्यात येणाऱ्या १० आणि १२ वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा  एक मार्चला तर  बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून होणार आहे.

 

 

या वर्षी अस्तित्वात आलेल्या कोकण विभागीय मंडळामार्फत दहावी व बारावीची परीक्षा प्रथमच होत आहे. या मंडळामार्फत दहावीच्या ४५  हजार ३८६, तर बारावीचे२९ हजार ४२५  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

 

 

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला नऊ विभागीय मंडळातून १३ लाख १७ लाख ४६ हजार ३०५ तर  दहावीला १७ लाख ११ हजार २१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बारावीला विज्ञान शाखेच्या चार लाख १२  हजार ८९५ विद्यार्थ्यांनी, कला शाखेच्या पाच लाख १५ हजार ९५७ विद्यार्थ्यांनी, वाणिज्य शाखेसाठी तीन लाख ४८ हजार २४२  विद्यार्थ्यांनी, तर एमसीव्हीसी अभ्यासक्रमाच्या ५९  हजार २११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

 

 

प्रत्येक जिल्ह्यासाठी सात या प्रमाणे २४५ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. राज्य पातळीवरील स्पर्धामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणारे २५ गुण यावर्षीपुरते कायम आहेत. मात्र, पुढीलवर्षीपासून या गुणांचा उपयोग केवळ उत्तीर्ण होण्यासाठी करण्यात येणार आहे.