मिनी विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात

मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी आज राज्यातील मतदार आपला कौल देतील. राज्यात २७ जिल्हा परिषदा आणि ३०५ पंचायत समित्यांसाठी निवडणुकांसाठी मतदानाला सुरवात झाली आहे.

Updated: Feb 7, 2012, 12:37 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी आज राज्यातील मतदार आपला कौल देतील. राज्यात २७ जिल्हा परिषदा आणि ३०५ पंचायत समित्यांसाठी निवडणुकांसाठी मतदानाला सुरवात झाली आहे. जिल्हा परिषदांच्या १६२४ जागांसाठी ७११६ तर पंचायत समितीच्या ३२१८ जागांसाठी १३,४७३ उमेदवार आपलं भवितव्य आजमावत आहेत.

 

राज्यात तीन कोटी ८९ लाख चार हजार ३८८ मतदार आहेत. त्यासाठी ५९ हजार ९१४ मतदान केंद्रे आणि सुमारे एक लाख ३८ हजार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

ठाणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ६६ जागांसाठी २७१ आणि १३ पंचायत समित्यांसाठी ६१६ उमेदवार रिंगणात आहेत. तर रायगडमधील जिल्हा परिषदेच्या ६१ जागांसाठी १८९ आणि पंचायत समित्यांच्या १२४ जागांसाठी ३८० उमेदवार आपलं भवितव्य आजमावत आहेत.

 

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी मतदान करता यावे यासाठी सरकारने भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे.