नितेश राणेंनी पराभवाचं खापर फोडलं पोलिसांवर

सिंधुदुर्गात झालेल्या दणदणीत पराभवानंतर आता त्या पराभवाचे आत्मचिंतन करणार असल्याचं स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी सांगितलं आहे. राणे यांना हा पराभव अत्यंत जिव्हारी लागला आहे.

Updated: Dec 14, 2011, 02:23 PM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे

सिंधुदुर्गात झालेल्या दणदणीत पराभवानंतर आता त्या पराभवाचे आत्मचिंतन करणार असल्याचं स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी सांगितलं आहे. राणे यांना हा पराभव अत्यंत जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आता ह्या पराभावामुळे नितेश राणे पराभवाचं आत्मचिंतन करणार आहे.

तरीही त्यांनी ह्या पराभवाचे अनेकांवर फोडले. त्यामुळे त्यांचा पराभव का झाला यांचे कारण देखील त्यांना शोधावे लागणार हे मात्र नक्की त्याचबरोबर पराभवाचं खापरही त्यांनी पोलिसांवर फोडलं आहे.

वेंगुर्ल्यात राडा सुरू असताना तिथले DYSP जाधव यांनी आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न केला, पण आपण संयम बाळगला, असं नितेश राणे म्हणाले. पुण्यात स्वाभिमान संघटनेतर्फे रोजगार यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.