पाणीमार्गात बोगदा, दुष्काळी भाग कोरडा

सातारा जिल्हयातल्या उरमोडी धरणातील पाणी दुष्काळी तालुक्यातल्या येराळवाडी धरणात पोहचवण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झोकात पार पडला खरा, पण प्रत्यक्षात दुष्काळी भागात पाणी पोहचलंच नाही.

Updated: May 29, 2012, 06:45 PM IST

www.24taas.com, सातारा

सातारा जिल्हयातल्या उरमोडी धरणातील पाणी दुष्काळी तालुक्यातल्या येराळवाडी धरणात पोहचवण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झोकात पार पडला खरा, पण प्रत्यक्षात दुष्काळी भागात पाणी पोहचलंच नाही.

हे पाणी बोगद्यात अडल्यामुळे पाणीपुरवठा बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुष्काळग्रस्त मात्र कोरडेच राहिले आहेत.  सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी 24 मे रोजी उरमोडी धरणातून येराळवाडी धरणात पाणी सोडण्यात आलं.

मात्र हे पाणी बोगद्यातून पुढे सरकत नसल्याचं तासाभरातच लक्षात आलं त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी पाणी सोडणं थांबवावं लागलंय. या पाण्यामुळे दुष्काळी भागाला दिलासा मिळणार होता. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुष्काळग्रस्तांच्या वाट्याला पाणीच मिळालं नसल्याचं चित्र पहायला मिळतंय. विशेष म्हणजे उदघाटनाच्या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं होतं. तसच अभियंत्यांनाही शाबासकीची थाप दिली होती.

Tags: