गेल्या प्रणिती कुणीकडे? उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून करुन दिली 'ती' आठवण; काँग्रेसची एकच धावपळ

Uddhav Thackeray on Praniti Shinde: उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खासदार प्रणिती शिंदेंना (Praniti Shinde) आघाडीधर्माची आठवण करुन द्यावी लागलीय. कारण खासदार प्रणिती शिंदे प्रचाराच्या रणधुमाळीतून गायब आहेत  

शिवराज यादव | Updated: Nov 11, 2024, 09:28 PM IST
गेल्या प्रणिती कुणीकडे? उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून करुन दिली 'ती' आठवण; काँग्रेसची एकच धावपळ title=

Uddhav Thackeray on Praniti Shinde सोलापुरात उद्धव ठाकरेंनी प्रणिती शिंदेंना आघाडी धर्माची आठवण करून दिलीये. कारण प्रणिती शिंदे प्रचारातून गायब आहेत. लोकसभेत प्रणिती शिंदेंसाठी प्रचार केला. त्यामुळे त्यांनी आता मविआच्या उमेदवारांसाठी प्रचार करावा असं थेट आवाहन उद्धव यांनी जाहीर सभेतून केलं आहे. पाहुयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट

उद्धव ठाकरेंना खासदार प्रणिती शिंदेंना आघाडीधर्माची आठवण करुन द्यावी लागली आहे. कारण खासदार प्रणिती शिंदे प्रचाराच्या रणधुमाळीतून गायब आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अमर पाटील या उमेदवाराच्या प्रचाराकडं त्या साध्या फिरकल्याही नाहीत. त्यामुळं उद्धव ठाकरेंना लोकसभेला प्रणितींसाठी केलेल्या प्रचाराची आठवण करुन द्यावी लागली.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवारांच्या दोन ते तीन सभा सोडून मी प्रणिती शिंदेंसाठी सोलापुरात प्रचाराला आलो होतो. त्यामुळे मी आता प्रणिती शिंदेंना सांगणार आहे की, प्रणिती तूदेखील आता शिवसेना उमेदवार अमर पाटलांच्या प्रचारात उतरलं पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

उद्धव ठाकरेंनी प्रणिती शिंदे प्रचारात दिसत नसल्याचं जाहीरपणे सांगितल्यानंतर मग सोलापूर काँग्रेसची धावपळ झाली आहे. सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्षांनी तातडीनं उद्धव ठाकरेंची भेट घेतली.. मविआच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एका दिलानं काम करणार असल्याचं आश्वासन त्यांनी ठाकरेंना दिलं.

महाविकास आघाडीत काँग्रेस संस्कृतीप्रमाणं रुसवेफुगवे सुरु आहेत. या हेव्यादाव्यामुळं सोलापुरात मविआच्या सगळ्याच उमेदवारांना मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.