पुण्यात बिल्डर तुपाशी सर्वसामान्य मात्र उपाशी

पुण्यात उद्यापासून पाणीकपात होणार आहे. ऐन उन्हाळ्यात सकाळी एकदाच पाणीपुरवठा होणार आहे. विशेष म्हणजे पुण्यातल्या बड्या प्रकल्पांच्या पाण्यात कपात करण्यात आलेली नाही. पाणीकपात काय ती फक्त सर्वसामान्य पुणेकरांसाठीच...

Updated: Feb 29, 2012, 09:07 PM IST

www.24taas.com, पुणे-अरुण मेहत्रे

 

पुण्यात उद्यापासून पाणीकपात होणार आहे. ऐन उन्हाळ्यात सकाळी एकदाच पाणीपुरवठा होणार आहे. विशेष म्हणजे पुण्यातल्या बड्या प्रकल्पांच्या पाण्यात कपात करण्यात आलेली नाही. पाणीकपात काय ती फक्त सर्वसामान्य पुणेकरांसाठीच...

 

पुण्यात एक मार्चपासून पाणीकपात करण्यात येणार आहे. पण या पाणीकपातीचा फटका फक्त सर्वसामान्य पुणेकरांनाच बसणार आहे. अमनोरा पार्क, नांदेड सिटी, डी.एस.कुलकर्णी, एल.के.डेव्हलपर्स, पंचरत्न टाऊनशिप अशा फाईव्हस्टार टाऊन शिप तसंच पुनावाला स्टड फार्म, साईजा स्टड फार्म, फोर सिझन वाईन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौंड शुगर कारखाना आणि त्यांचे भाऊ राजेंद्र पवार यांचा बारामती ऍग्रो हा खाजगी साखर कारखाना या सगळ्यांच्या पाणीपुरवठ्यात मात्र कपात करण्यात आलेली नाही.

 

पाण्याची टंचाई असूनही पुणे महापालिका या बड्या धेंडांसाठी पाणी कपातीचं धाडस करु शकलेली नाही. कारण या सगळ्यांना पाणी देण्याचा निर्णय अजित पवारांचाच आहे. बिल्डरांना आणि बड्या प्रकल्पांना मुक्तहस्ते पाणी द्यायचं आणि सर्वसामान्य पुणेकरांसाठी पाणी कपात यावर पुणेकरांनी संताप व्यक्त केलाय.

 

बिल्डर आणि उद्योगांना शेतीचं पाणी देण्याच्या निर्णयाविरोधात शेतकरी कोर्टात लढा देतायत. आता पुरेसं पाणी मिळवण्यासाठी पुणेकरांनाही त्याच मार्गानं जावं लागणार आहे. कारण राजकारणी, प्रशासन आणि बिल्डर्स यांनी मिळून पुणेकरांच्या तोंडचं पाणी पळवलंय.

 

पुण्यातलं हे मगरायण बराच काळ सुरू राहणार अशीच चिन्हं आहेत. या प्रकरणी वनविभागासह संबंधित विभागानं योग्य ती कारवाई करुन या विषयावर पडदा टाकणं गरजेचं आहे. त्याशिवाय या मगरमिठीतून पुणेकरांची सुटका होणं शक्य नाही.

[jwplayer mediaid="57809"]