www.24taas.com, पुणे
पुण्यातल्या खडकवासल्यातल्या मगरीला पकडण्यात आलं असलं तरी पुण्य़ाची मगरमिठीतून सुटका झालेली नाही. पुण्यातल्या वेगवेगळ्या तलावांमध्ये मगरी असल्याची माहिती मिळालीय. त्यामुळे या मगरी नक्की येतात कुठून, असा प्रश्न आता पुणेकरांना पडला आहे.
खडकवासाल्याच्या कालव्यातून पक़डण्यात आलेली मगर कोल्हापूरच्या अभयारण्यात सोडण्यात आलीय. असं असलं तरी पुण्यात मगरींची दहशत अजून संपलेली नाही. पुण्याच्या वरसगाव धरणात आतापर्यंत सात मगरी सोडण्यात आल्यायत. याशिवाय खडकीतलं शांतीनगर आणि लोणी काळभोरच्या नदीपात्रातही मगरी आढळून आल्यायत. पुण्याच्या कात्रज तलावातही दोन वर्षांपूर्वी मगर सापडली होती. त्यामुळे पुण्यात मगरींची छुपी पैदास तर सुरू नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
वरसगाव धरणात सोडण्यात आलेल्या मगरीला पिलावळ झाल्याचीही शक्यता आहे. त्याच मगरी विविध मार्गांनी विविध ठिकाणी पोहोचू शकतात. त्यामुळे खडकवासल्यातली मगर ही वरसगाव धरणातल्या मगरीची वंशज असल्याची शक्यता आहे.