पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुण्यात टीव्ही सिरियल्समध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीला वेश्या व्यवसाय केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कसोटी जिंदगी की या गाजलेल्या सिरियल्समध्ये या अभिनेत्रीने काम केलं आहे.

Updated: Nov 19, 2011, 06:20 PM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे

पुण्यात टीव्ही सिरियल्समध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीला वेश्या व्यवसाय केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कसोटी जिंदगी की या गाजलेल्या सिरियल्समध्ये या अभिनेत्रीने काम केलं आहे. पोलिसांनी एका फाईव्ह स्टार हॉटेलवर धाड घालून या २१ वर्षीय अभिनेत्रीला अटक केली. अटक करण्यात आलेली अभिनेत्री मुळची काश्मीरची आहे.

 

धीरज नाथानी या दलालाही अटक करण्यात आली आहे. टीव्ही सिरियल्समध्ये काम करणारी ही अभिनेत्री दलालाच्या मार्फत वेश्याव्यवसाय करते आणि ग्राहकांकडून तासाला लाख ते दीड लाख रुपये घेते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून या अभिनेत्रीला अटक केली.

Tags: