'पैशांचं' प्रदर्शन

पुण्यातल्या चतुःश्रुंगी येथील सांस्कृतिक भवनात चलनी नोटांचे प्रदर्शन सुरु आहे . कागदी चलनाचा इतिहास काय आहे,त्यामध्ये कशी स्थित्यंतर झाली आणि कागदी चलनाची काय स्थिती आहे याविषयी सर्व माहिती तुम्हाला येथे मिळेल.

Updated: Nov 7, 2011, 05:05 AM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे

पुण्यातल्या चतुःश्रुंगी येथील सांस्कृतिक भवनात चलनी नोटांचे प्रदर्शन सुरु आहे . कागदी चलनाचा इतिहास काय आहे,त्यामध्ये कशी स्थित्यंतर झाली. जगात कागदी चलनाचा प्रसार कसा झाला आणि आज प्लस्टीक मनी किंवा ऑनलाईन व्यवहाराचं प्रस्थ वाढत असताना कागदी चलनाची काय स्थिती आहे याविषयी सर्व माहिती तुम्हाला येथे मिळेल.

 

अमेरिकन डॉलर, सध्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या ग्रीसचं चलन, युरोपीयन युनियनच युरो, महासत्ता होऊन पाहणा-या चीनच चलन आणि पाकिस्तानी चलन. जगातील साठ देशांमधील कागदी चलन आणि जुन्या नोटा, नाणी यांचे भव्य प्रदर्शन पुण्यात भरलंय. १९०६ सालची सगळ्यात जुनी नोटही याठिकाणी आहे. १५ व्या शतकापासूनची नाणीही याठिकाणी आहेत. विविध देशांचे चलन पाहण्याबरोबरच नोटांचा कागद, छपाईतंत्र, नोटांची सुरक्षितता, दोन महायुद्ध आणि जागतिक मंदी या संकटांना कागदी चलनानं कसं तोंड दिलं. याचीही माहितीही प्रदर्शनात दिली जातेय.

 

प्रदर्शनात सर्वाधिक नोटा आणि रंजक माहिती आहे ती जर्मनीच्या नोटांविषयी. दुस-या महायुद्धाच्या काळात जर्मनीतील प्रत्येक गावानं त्यांच्या नोटा काढल्या होत्या. यातील बहुतेक नोटा प्रदर्शनात उपलब्ध आहेत. त्यामुळंच या प्रदर्शनाला पुणेकरांनी गर्दी केलीय.