वाळू माफियांचा उच्छाद सुरूच...

अहमदनगर जिल्ह्यात वाळू माफियांचा उच्छाद सुरुच आहे. अहमदनगर जिल्र्हयातील गोदावरी नदीपात्रातील खानापूर केटीवेअरजवळ अनधिकृत वाळू उपसा करणारा टेम्पो ५० ग्रामस्थांनी पकडून महसूल आणि पोलीस अधिकार्‍यांना घटनास्थळी बोलावलं.

Updated: May 8, 2012, 11:40 AM IST

www.24taas.com, अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यात वाळू माफियांचा उच्छाद सुरुच आहे. अहमदनगर जिल्र्हयातील गोदावरी नदीपात्रातील खानापूर केटीवेअरजवळ अनधिकृत वाळू  उपसा करणारा टेम्पो ५० ग्रामस्थांनी पकडून महसूल आणि पोलीस अधिकार्‍यांना घटनास्थळी बोलावलं.

यामुळे चिडलेल्या वाळू तस्करांनी ग्रामस्थ तसंच महसूल आणि पोलीस अधिकार्‍यांवर दगड आणि ढेकळांचा मारा केला. एवढ्यावरच ते थांबले नाही तर टेम्पोमधील डिझेल पोलीस आणि ग्रामस्थांच्या अंगावर फेकून त्यांना पेटविण्याचा प्रयत्न केला. याच वेळी वाळु तस्करांनी टँम्पोही पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या गोंधळाचा फायदा घेऊन वाळू तस्कर वाळूचा टेंपो तेथुन घेऊन पसार होण्यात यशस्वी झाले आहेत.

याप्रकरणी २५ वाळूतस्करांविरूद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोनच दिवसापूर्वी राहाता येथील नायब तहसीलदारांना वाळूतस्करांनी केलेल्या मारहाणीची घटना ताजी असताना काल पुन्हा ही घटना घडल्याने संताप व्यक्त केला जातो आहे.