शिर्डी संस्थान बरखास्तीचे आदेश

शिर्डी संस्थान बरखास्तीचे आदेश देण्यात आले आहेत. औरंगाबाद खंडपीठानं हे आदेश दिले आहेत. औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयामुळं शिर्डीत ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

Updated: Mar 13, 2012, 02:08 PM IST

www.24taas.com, शिर्डी

 

शिर्डी संस्थान बरखास्तीचे आदेश देण्यात आले आहेत. औरंगाबाद खंडपीठानं हे आदेश दिले आहेत.

 

औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयामुळं शिर्डीत ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. द्वारका माई परिसरात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात आतषबाजी केली. नव्या विश्वस्त समितीत तरी ग्रामस्थांना योग्य स्थान द्यावे आणि शिर्डीच्या विकासाक़डे समितीने लक्ष द्यावे या मागण्या यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

 

दरम्यान नवी समिती नेमण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. नाहीतर या समितीची सगळी सूत्र जिल्हा न्यायालयाकडे सोपवली जाणार आहेत. शिर्डी संस्थान समिती २००४ साली नेमण्यात आली होती. या समितीला तीन वर्षांची मुदत होती. या समितीला सतत आठ वर्ष मुदतवाढ देण्यात आली.

 

शिर्डी संस्थान समितीला वेळोवेळी देण्यात आलेली ही मुदतवाढ आणि संस्थानच्या कारभाराविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निर्णय देताना औरंगाबाद खंडपीठानं शिर्डी संस्थान बरखास्तीचे आदेश दिले आहेत.