७० फूट खड्ड्यातून चिमुरड्याची सुटका!

अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यात बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुरड्या मनोज घोरपडेला दोन तासांच्या अथक प्रयत्नांनतर बाहेर काढण्यात यश आलंय. ही घटना कानड या गावी घडली.

Updated: Jul 9, 2012, 06:23 PM IST

www.24taas.com, नगर

अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यात बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुरड्या मनोज घोरपडेला दोन तासांच्या अथक प्रयत्नांनतर बाहेर काढण्यात यश आलंय.  ही घटना कानड या गावी घडली.

चार वर्षांच्या मनोजला उपचारांसाठी राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तब्बल 250फूट खोल बोअरमध्ये मनोज पडला होता. मात्र सुदैवानं तो 22 फुटांवर अडकला होता.

उत्तर भारतात प्रिन्स नावाचा बालक बोरवेलमध्ये पडल्यानंतर बोरवेलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या घटनेला आज पाच पेक्षा अधिक वर्ष झालीत तरी हा प्रश्न अजूनही सुटला नाही. देशात अशा प्रकारे महिना दोन महिन्यात अपघात घडत असतात.. त्याकडे कोणाचेही लक्ष नाही.