NDA मध्ये बोगस विद्यार्थी !

अनमोल बनात्रानं बिनदिक्कत पुण्याच्या NDA मध्ये प्रवेश मिळवला. NDA ची राष्ट्रीय पातळीवरच्या १२७ व्या तुकडीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं बनावट प्रमाणपत्रं, तसंच इतर बोगस प्रमाणपत्रांच्या मदतीनं त्यानं NDA मध्ये प्रवेश मिळवला.

Updated: Jan 6, 2012, 10:37 PM IST

www.24taas.com, पुणे

 

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संवेदनशील मानल्या जाणाऱ्या पुण्यातल्या NDA ची अभेद्य सुरक्षाव्यवस्था पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे एक काश्मिरी तरुण तब्बल पाच दिवस या NDA मध्ये रहात होता. अनमोल बनोत्रा या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

 

अनमोल बनात्रानं बिनदिक्कत पुण्याच्या NDA मध्ये प्रवेश मिळवला. NDA ची राष्ट्रीय पातळीवरच्या १२७ व्या तुकडीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं बनावट प्रमाणपत्रं, तसंच इतर बोगस प्रमाणपत्रांच्या मदतीनं त्यानं NDA मध्ये प्रवेश मिळवला.  ३१ डिसेंबरला अनमोल NDA त दाखल झाला.

 

चार जानेवारीपर्यंत त्याची बनवेगिरी कुणाच्याही लक्षात आली नाही. ज्येवळी NDA मध्ये दाखल असलेल्या कॅडेटसची संख्या ३०० ऐवजी ३०१ भरल्याचं समोर आलं आणि हा सगळा प्रकार उघड झाला.

 

NDA ही पुण्यातलीच नव्हे तर देशातली महत्त्वाची संरक्षण संस्था आहे. या प्रकरणानंतर NDA च्या सुरक्षेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतायत. NDAच्या प्रवेश प्रक्रियेत त्रुटी आहेत का, या ठिकाणी दाखल होणाऱ्या कॅडेट्सची पडताळणी होत नाही का, बोगस विद्यार्थी चार दिवस राहूनही त्याचा संशय का आला नाही,  या प्रश्नांचं स्पष्टीकरण अजून मिळालेलं नाही.

 

गेल्या काही वर्षांत NDA कायम दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राहिलं आहे. काही वर्षांपूर्वी इथे उर्दू शिकवणाऱ्या प्राध्यापकाला दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याच्या कारणावरुन CBI नं ताब्यात घेतलं होतं. ISI साठी हेरगिरी केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विश्वंभर अगरवालकडेही NDA चे फोटो मिळाले होते. त्यामुळे अतिशय संवेदनशील असलेल्या या NDA ची सुरक्षा आणखी मजबूत असणं त्याचबरोबर व्यवस्थेतल्या त्रुटीही दूर करणं गरजेचं आहे.

 

[jwplayer mediaid="24719"]