मनसे कार्यकर्त्यांचा धुडगूस

शुल्लक कारणावरुन मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डॉक्टरांना मारहाण केलीये. महापालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये ही घटना घडलीये. हॉस्पिटलमध्ये एका रुग्णावर उपचार सुरु होते. या रुग्णाला सलाईन लावण्यावरुन वाद झाला.

Updated: Mar 29, 2012, 08:29 AM IST

www.24taas.com, मुंबई

शुल्लक कारणावरुन मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डॉक्टरांना मारहाण केलीये. महापालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये ही घटना घडलीये. हॉस्पिटलमध्ये एका रुग्णावर उपचार सुरु होते. या रुग्णाला सलाईन लावण्यावरुन वाद झाला.

याच वादातून गणेश बिरवडकर. सागर गायकर, दीपेश गोहित आणि रमेश गोहित यांनी डॉक्टर पी. संतोष यांना मारहाण केली. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

यवतमाळमध्ये तोडफोड 

यवतमाळच्या जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केलीये. समाज कल्याण विभागाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह चालवण्यात येतात. या वसतीगृहांमध्ये विद्यार्थ्यांना दिलेल्या निकृष्ठ बिछान्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.

सुरुवातीला समाज कल्याण विभागाच्या अधिका-यांना मनसे कार्यकर्ते भेटण्यास आले होते. मात्र कार्यालयात कोणताही कार्यकर्ता उपस्थित नव्हता. त्यामुळं संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सोबत आणलेल्या बिछान्यांना आग लावली. शिवाय कार्यालयातल्या सामानाची फेकाफेक केली. मनसेच्या या आंदोलनामुळं परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.