६ जिल्ह्यातील बँकांचं काही खरं नाही

राज्यातल्या सहा जिल्हा बँका अडचणीत सापडल्या आहेत. या बँकांना परवाने देण्यास आरबीआयनं नकार दिला आहे. आरबीआयच्या नियमांची पूर्तता न केल्यानं आरबीआयनं हा निर्णय घेतला आहे.

Updated: Apr 10, 2012, 10:13 PM IST

www.24taas.com, मुंबई

राज्यातल्या सहा जिल्हा बँका अडचणीत सापडल्या आहेत. या बँकांना परवाने देण्यास आरबीआयनं नकार दिला आहे. आरबीआयच्या नियमांची पूर्तता न केल्यानं आरबीआयनं हा निर्णय घेतला आहे.

यात दिवाळखोरीत गेलेल्या नागपूर, वर्धा, बुलढाणा, धुळे आणि जालना, उस्मानाबाद या जिल्हा बँकांचा समावेश आहे. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ही माहिती विधिमंडळात दिली आहे. या बँका दुसऱ्या बँकांमध्ये विलिनीकरण करण्याचा पर्याय सरकारसमोर आहे. मात्र तरीही बँका वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.

तर याआधी धुळे नंदूरबार जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं होतं. नाबार्डच्या शिफारशीवरुन आरबीआयनं ही कारवाई केली होती. जिल्हा बँकेवर तीन अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बँकेचं थकीत कर्ज वाढल्यानं ही कारवाई करण्यात आली होती.

Tags: