www.24taas.com, मुंबई
तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा असेल तर थोडी वाट पाहा. कारण केवळ पाच हजारात लॅपटॉप उपलब्ध होणार आहे.
कम्प्युटरनंतर आता लॅपटॉपहीमध्यमवर्गीयांच्या आवाक्यातयेण्याची चिन्हे असून लंडनस्थित भारतीय तज्ज्ञाच्या 'अलाईड कम्प्युटर्स इंटरनॅशनल (आशिया ) लिमिटेड ' याकंपनीने लॅपटॉप फक्त चारहजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे . तसेच आय - ३ सीपीयू असलेले कम्प्युटर १९ हजार ९९९ रुपयांत मिळणार आहेत .
जूनच्या मध्यापर्यंत हा लॅपटॉप बाजारात येणार आहेत . क्षेपणास्त्र तंत्रज्ञ आणि उद्योजक हिरजी पटेल यांच्या मालकीच्या ' अलाईड कम्प्युटर्स 'ने सुपर लोकॉस्ट कम्प्युटर्स बाजारात आणण्याचे कबूल केले आहे . यात लॅपटॉपचेथर्ड जनरेशनचे दहा इंची मॉडेल फक्त चार हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध करूनदेण्यात येणार आहे .
आय ७ असलेल्या लॅपटॉपचे लेटेस्ट थर्ड जनरेशन मॉडेलही लवकरच बाजारात येणार असून हा सर्वात वेगवान गेमिंग लॅपटॉप असेल , असा दावा पटेल यांनी केलाआहे . यात ३२ जीबी इतकी जबरदस्त रॅमही असणार आहे . किंमत खूपच कमीअसली तरी या लॅपटॉपच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही , अशीग्वाही हिरजी पटेल यांनी दिली आहे .