सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने देशात ‘गॅलेक्सी नोट’ हे उत्पादन बाजारात आणलं आहे. ‘गॅलेक्सी नोट’चा टॅबलेट पीसी आणि मोबाईल हँडसेट असा दुहेरी वापर करता येणार आहे. गॅलेक्सी नोट किंमत ३४,९९० रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
टॅबलेट पीसी पेक्षा आकाराने लहान पण सर्वसाधारण हँडसेटपेक्षा मोठं असं हे उपकरण आहे. गॅलेक्सी नोटचा ५.३ इच हाय डेफिनेशन टचसक्रिन डिसप्ले हे त्याचं खास आकर्षण ठरु शकेल. मोबाईल इंडस्ट्री नवी कॅटेगरी या उत्पादनामुळे उदयाला येईल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. स्मार्ट पेन या प्रगत पेन इनपुट तंत्रज्ञानामुळे गॅलेक्सी नोट अधिक उपयुक्त ठरेल. स्मार्ट पेनमुळे स्केच काढणे, लिहिणे हे सहजसुलभ होईल. अँड्रोईडवर आधारित या उपकरणात १.४ जीएचझेड ड्य़ुल कोर प्रोसेसर आणि ८ एमपी कॅमेरा तसंच २ एमपी कॅमेराचाही अंर्तभाव आहे.