www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्रात वीजटंचाई आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागात सुरु असलेल्या लोडशेडिंगमुळे नागरिक हैराण आहेत. वेळोवेळी कळत नकळतपणे वीजेचा अपव्यय होतो. मात्र अशाप्रकारे वीजेचा अपव्यय टाळता येऊ शकतो.
यासाठी आघाडीची कंपनी गोदरेजनं पुढाकार घेतला आहे. देशातल्या वेगवेगळ्या शहरात वीज बचतीचा संदेश देणारी वाहनं फिरत आहे. यावेळी गोदरेजचे प्रतिनिधी नागरिकांना वीजेचा अपव्यय कशाप्रकारे टाळता येईल याची माहिती देत आहेत.
इतकंच नाहीतर कंपनीनं यासाठी एक सॉफ्टवेअर बनवलं आहे. या सॉफ्टवेअरमधून किती प्रमाणात वीज वाचवणं शक्य आहे याची माहिती नागरिकांना देण्यात येते. त्यामुळे गोदरेज सारख्या नामांकित कंपनीने एक चांगलं पाऊल उचलले आहे.