बजाजची छोटी गाडी लवकरच

टाटा नानोला टक्कर देण्यासाठी बजाज आपली पहिली नवी कार लवकरच लँच करणार आहे. बजाज आपल्या ८० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कमी किंमतीची चार चाकी बाजारात आणणार आहे. दिल्लीत सात जानेवारी पासून सुरू होणाऱ्या ऍटो एक्सपो मध्ये बजाज कंपनी ही कार लँच करणार आहे.

Updated: Jan 2, 2012, 01:47 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

टाटा नानोला टक्कर देण्यासाठी बजाज आपली पहिली नवी कार लवकरच लँच करणार आहे. बजाज आपल्या ८० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कमी किंमतीची चार चाकी बाजारात आणणार आहे. दिल्लीत सात जानेवारी पासून सुरू होणाऱ्या ऍटो एक्सपो मध्ये  बजाज कंपनी ही कार लँच करणार आहे.

या कारचं आरई-६० असं नामकरण करण्यात आलं आहे. बजाजने टाटा नानोशी स्पर्धा करणार नसल्याचं जरी स्पष्ट केलं असलं तरी भविष्यात तीन चाकी आणि चार चाकी श्रेणीत कमी किंमतीतलं प्रवासी आणि मालवाहतूकीचं साधन ठरेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही कार दोन किंवा तीन सिलेंडर वाली ७००-८०० सीसी पेट्रोल इंजिनची असले. तसंच ही कार तासाला ९० किमी पेक्षा अधिक वेगाने धावू शकणार नाही. चांगलं माईलेज. हे या गाडीचे खास वैशिष्ट्यं असेल. बजाजची कार प्रति लिटर ३० किमि सरासरी माईलेज देईल.