भारत बनतोय 'टेक्नोसॅव्ही'

इंटरनेट आणि मोबाईलच्या वापरात भारतानं आघाडी घेतली आहे. फेसबूकवर भारतीयांची संख्या जवळपास 5 कोटी 10 लाखांच्या घरात पोहोचली आहे. तर दुसरीकडे 921 मिलियन म्हणजेच 92 कोटी 10 लाख भारतीय मोबाईल वापरत असल्याची माहिती समोर आली आहे.

Updated: Jul 29, 2012, 08:06 PM IST

www.24taas.com, मुंबई

इंटरनेट आणि मोबाईलच्या वापरात भारतानं आघाडी घेतली आहे. फेसबूकवर भारतीयांची संख्या जवळपास 5 कोटी 10 लाखांच्या घरात पोहोचली आहे. तर दुसरीकडे 921 मिलियन म्हणजेच 92 कोटी 10 लाख भारतीय मोबाईल वापरत असल्याची माहिती समोर आली आहे.

पुढील महिन्यात ही संख्या 100 कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. जवळपास 1 कोटी 60 लाख भारतीयांचं ट्विटरवर अकाऊंट आहे. जगभरातील 5 कोटी लोकांचं ट्विटरवर अकाऊंट आहे.

त्यात भारतीयांची संख्या पाहता ट्विटरवरही भारतानं आघाडी घेतल्याचं दिसतय. तर मोबाईल्सची संख्या लक्षात घेता भारतीय दररोज 1700 कोटी मिनिटं बोलतात. तर 100 अब्ज 50 कोटी मेसेजेसची दररोज देवाण-घेवाण होते.