ऋषभ पंतची मोठी झेप! ICC टेस्ट रॅंकींगमध्ये मिळाले सहावे स्थान, रोहित अन् विराटला 'जोर का झटका'

Rishabh Pant: आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठा बदल झाला असून ऋषभ पंतने सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. यामुळे रोहित-विराटला बसला जबर धक्का बसला आहे. 

तेजश्री गायकवाड | Updated: Nov 7, 2024, 11:37 AM IST
ऋषभ पंतची मोठी झेप! ICC टेस्ट रॅंकींगमध्ये मिळाले सहावे स्थान, रोहित अन् विराटला 'जोर का झटका' title=
Photo Credit: BCCI

ICC Test Rankings: ताज्या आयसीसी  कसोटी क्रमवारीत टीम इंडियाचे सुपरस्टार रोहित शर्मा आणि विराट कोहली टॉप-10 मधून बाहेर झाले आहेत. दरम्यान, ऋषभ पंतने चांगलीच झेप घेतल्याचे दिसून येत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील भारताच्या दारूण पराभवानंतर आयसीसीने पुन्हा एकदा कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. दरम्यान, भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला थोडा फायदा झाला आहे. तर यशस्वी जैस्वालला धक्का बसला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही स्टार खेळाडूंना मात्र तगडा फटका बसला आहे.

कोण आहे अव्वल स्थानावर?  

आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा जो रूट अजूनही अव्वल स्थानावर आहे. त्याचे रेटिंग 903 आहे. तर केन विल्यमसन दुसऱ्या क्रमांकावर असून त्याचे रेटिंग 804 आहे म्हणजेच पहिला आणि दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज यांच्यात फरक बराच मोठा आहे. यानंतर इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता 778 रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

हे ही वाचा: Rishabh Pant: संस्कार! ऋषभ पंत आईचा आशीर्वाद घेऊन ऑस्ट्रेलियाला रवाना, एअरपोर्टवरील Video होतोय Viral

यशस्वी जैस्वालचे स्थान घसरले 

यशस्वी जैस्वाल न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत काही विशेष करू शकला नाही, त्यामुळेच तो आता एका स्थानाने घसरून चौथ्या क्रमांकावर आला आहे, त्याचे रेटिंग आता 777 आहे. स्टीव्ह स्मिथ अजूनही 757 च्या रेटिंगसह 5व्या क्रमांकावर आहे. ऋषभ पंतने मुंबई कसोटीत इतर फलंदाजांच्या तुलनेत सरस कामगिरी केली होती, त्याचाच फायदा त्याला यावेळी क्रमवारीत होताना दिसत आहे. त्याने आता पाच स्थानांनी झेप घेत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग 750 झाले आहे. या दोघांशिवाय भारताचा एकही फलंदाज टॉप 10 मध्ये स्थान मिळवू शकलेला नाही.

हे ही वाचा: Pro Kabaddi League: अजित चव्हाणच्या चढाया ठरल्या निर्णायक, यू मुंबाने पटणा पायरेट्सवर मिळवला विजय

विराट कोहली आणि रोहित शर्मा टॉप 10 मधून बाहेर 

विराट कोहली 8 स्थानांनी खाली गेला आहे. त्याचे रेटिंग 655 पर्यंत घसरले असून तो 22 व्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर तो थेट 26 व्या क्रमांकावर गेला आहे. त्याला दोन ठिकाणी पराभव पत्करावा लागला आहे. त्याचे रेटिंग सध्या 629 आहे. याचाच अर्थ आता या दोघांनाही टॉप 10 मध्ये परतणे खूप कठीण जाणार आहे.