Health News : देशात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा मृत्यूंना आता वयाची मर्यादा देखील राहिलेली नाही. तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत असून हिवाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनते असे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच संशोधनात असे आढळून आले आहे की, बहुतांश घटनांमध्ये हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णाचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू होतो, यावरून हृदयविकाराचा झटका आल्यास तत्काळ प्रथमोपचाराच देणे आवश्यक असते. जेणे करुन रुग्णालयात नेण्यास मदत होऊ शकते.
कानपूरच्या LPS कार्डिओलॉजी हॉस्पिटलचे वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नीरज कुमार यांनी स्वस्त आणि सोपे असे 'राम किट' विकसित केले आहे. हे किट अवघ्या 7 रुपयांमध्ये उपलब्ध आहे आणि त्यात हृदयविकाराचा झटका आल्यास तीन आवश्यक औषधांचा वापर त्यामध्ये करण्यात आला आहे. यामध्ये इकोस्प्रिन, सॉर्बिट्रेट आणि रोसुवास 20
डॉक्टर नीरज कुमार म्हणतात की, हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णाने ही तीन औषधे घेतल्यास त्याचा जीव वाचण्याची शक्यता लक्षणीय वाढते. लोकांना औषधांचे नाव सहज लक्षात राहावे आणि संकटाच्या वेळी त्याचा त्वरित वापर करता यावा यासाठी या किटला 'राम किट' असे नाव देण्यात आले आहे. 'राम किट' नाव देण्यामागचा उद्देश लोकांमध्ये भावनिक संबंध निर्माण करणे हा आहे, जेणेकरून ते या किटबद्दल अधिक जागरूक आणि आत्मविश्वासाने बनतील.
हृदयविकाराचा झटका आल्यास हे किट वापरण्यास अतिशय सोपे आहे. इकोस्प्रिन रक्त पातळ करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा सुधारतो. Sorbitrate टॅब्लेट हृदयाला त्वरित आराम देते आणि Rosuvas 20 कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे. योग्य वेळी वापरल्यास या औषधांचे मिश्रण जीवरक्षक ठरू शकते.
डॉक्टर नीरज कुमार यांचे म्हणणे आहे की, या किटचा वापर नियमितपणे करू नये, तर केवळ हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीतच वापरावा.