‘आकाशा’त भरारी मारण्याची संधी

जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट आकाशची निर्माती डाटाविंडने विद्यार्थी आणि सोशल नेटवर्किंग स्टार्टअपसाठी आनंदाची बातमी दिली आहे. आकाशचे निर्माते डाटाविंड यांनी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वोत्कृष्ट ऍप्लिकेशन्स आकाशमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

Updated: Nov 29, 2011, 12:46 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट आकाशची निर्माती डाटाविंडने विद्यार्थी आणि सोशल नेटवर्किंग स्टार्टअपसाठी आनंदाची बातमी दिली आहे. आकाशचे निर्माते डाटाविंड यांनी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वोत्कृष्ट ऍप्लिकेशन्स आकाशमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

विद्यार्थी समुदायामध्ये आंत्रप्रेन्युर संस्कृती रुजावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. तसंच विद्यार्थ्यांनी उपयुक्त ऍप्लिकेशन विकसीत केल्यास ते लाखो टॅबलेटमध्ये वापरण्यात येईल असं असं डाटाविंडचे सुनीत सिंग तुली यांनी सांगितलं. आकाशच्या युबीस्लेटसाठी तीन लाखांचे बुकिंग झाले आहे.युबीस्लेट ३००० रुपयांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच इंटरनेट ऍक्सेससाठी ९९ रुपयांचा डाटा प्लॅनचाही समावेश आहे.

विद्यार्थ्यांना ऍप्लिकेशनच्या वापराच्या मोबदल्यात रॉयल्टी आणि कंपनीलाही उपयुक्त ऍप्लिकेशन उपल्बध करुन देता येईल. कंपनी सर्वोत्कृष्ट ऍप्लिकेशन विकसीत करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात येणार आहे. आकाशची टॅबलेट गुगलच्या ऍण्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम 2.2 आधारीत आहे.

सामाजिक क्षेत्रातील संघटनांना देखील या कमी किंमतीततील टॅबलेटचा फायदा होणार आहे. नॅसकॉमने सोमवारी डाटाविंडसोबत भागीदारी जाहीर केली आणि त्या माध्यमातून ते स्वंयसेवी संस्थांना २०० टॅबलेटचे वाटप करणार आहेत. नॅसकॉम फाऊंडेशनने स्पर्धा जाहीर केली आहे त्यात १० स्वंयसेवी संस्थांना २० टॅबलेट जिंकण्याची संधी आहे. यासाठी शिक्षण, आरोग्य आणि उपजिविका क्षेत्रात आकाशचा परिणामकारक उपयोग करुन दाखवणाऱ्या स्वंयसेवी संस्थांना या टॅबलेट देण्यात येतील.