www.24taas.com, नवी दिल्ली
ऑलिम्पिकसाठी तयारी करताना भारतीय पुरूष हॉकी टीमने मंगळवारी मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडीयम मध्ये चालू असणाऱ्या ऑलिम्पिक क्वालिफायर सामन्यात फ्रांसला ६-२ ने हरवून सलग तिसरा विजय नोंदवला आहे.
कॅनडा आणि पोलंड यांच्या विरूद्ध होणाऱ्या सामान्याआधी भारतीय टीमने अतिशय चांगलं प्रदर्शन केलं आहे. आणि त्याचसोबत पॉईेंट टेबलमध्ये त्यांनी प्रथम स्थान टिकवून ठेवलं आहे. भारताचा ट्रंपकार्ड ड्रैग फ्लिकर संदीप सिंह आणि प्लेमेकर एस. व्ही. सुनील यांनी सर्वोत्तम खेळ करून आपली प्रभाव पाडला.
संदीपने लागोपाठ दुसऱ्या मॅचमध्ये गोलच्या हॅट्रीकला गवसणी घातली. तर सुनील दुसऱ्यांदा 'मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. भारताने फ्रासंच्या गोलपोस्टवर सतत हल्ले चढवले आणि त्यांनी त्यांच्या बचावाला भेदण्याचा सतत प्रयत्न केला. तर मागील दोन सामन्यापेक्षा भारतीय डिफेंन्सने आज शानदार खेळ केला.
सिंगापुरला १५-१ आणि इटलीला ८-१ हरवणाऱ्या भारतीय टीममधील ड्रॅग फ्लिकर संदीप सिंहने (९मि, ३० मि. आणि ३७मि.) शिवेंद्र सिंह (४ मि.) एस व्ही सुनील (४० मि.) तुषार खांडेकर (६३ मि.)ला गोल केले. तर फ्रांससाठी लुकास सेवेस्टर (३५ मि.) आणि फेबियन मेगनेर (५६ मि.) याने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला.
तर याच सोबत महिला हॉकी संघानेही सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. भारताने पोलंडवर ३-० असा विजय मिळवला. रितू राणीने १४व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर राणी रामपालने ३६व्या तर पूनम राणीने ६२व्या मिनिटाला तिसरा गोल केला. पोलंड महिला हॉकी टीमला भारतीय टीमने एकही गोल करण्याची संधी दिली नाही. भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.