युरो कप : स्पेनची फायनलमध्ये धडक

पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेननं पोर्तुगालवर विजय मिळवत युरो कपची फायनल गाठलीय. दोन्ही टीम निर्धारित वेळेत गोल करण्यास अपयशी ठरल्या. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रुनो अल्वेसची मिस झालेल्या पेनल्टीमुळं पोर्तुगालचा घात झाला आणि स्पेननं ४-२ नं पेनल्टी शूटआऊटमध्ये थरारक विजय मिळवला.

Updated: Jun 28, 2012, 08:38 AM IST

www.24taas.com, युक्रेन

 

पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेननं पोर्तुगालवर  विजय मिळवत युरो कपची फायनल गाठलीय. दोन्ही टीम निर्धारित वेळेत गोल करण्यास अपयशी ठरल्या. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रुनो अल्वेसची मिस झालेल्या पेनल्टीमुळं पोर्तुगालचा घात झाला आणि स्पेननं ४-२ नं पेनल्टी शूटआऊटमध्ये थरारक विजय मिळवला.

 

युरो कपच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये स्पेनन बाजी मारलीय. पोर्तुगालला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ ने पराभूत करत स्पेनने दिमाखात फायनल गाठलीय. फायनलमध्ये स्पेनला अजेय जर्मनी किंवा बलाढ्य अशा इटलीशी झुंज द्यावी लागणार आहे.  सेमी फायनलच्या या मॅचमध्ये १२० मिनिटांचा खेळ होऊनही स्पेन आणि पोर्तुगालच्या दिग्गजांना एकही गोल करता आला नाही आणि सेमी फायनलची पहिलीच मॅच पेनल्टी शुटऑऊटमध्ये गेली. रोनाल्डो, नानी, जेराल्ड, फेब्रेगेस अशा सर्वांनीच अतोनात प्रयत्न केले प्रयत्नांची पराकाष्ठाच केली मात्र तरीही पहिल्या ९० मिनिटांत दोन्हीही टीम्स गोल करु शकल्या नाहीत. मॅच एक्स्ट्रा टाईममध्ये गेली. लीगमध्ये आपल्या रंगात आलेल्या रोनाल्डोची जादूही या मॅचमध्ये चालली नाही. वाढत्या वेळे बरोबरच फुटबॉलर्सचा धैर्य आणि संयमही कमी कमी होत गेला.

 

त्यामुळेच दोन्ही टीम्सला या मॅचमध्ये फ्री किक, कॉर्नर्स आणि यलो कार्ड्सही मिळाले मात्र कशाच उपयोग झाला नाही आणि मॅच अखेर पेनल्टी शुटआऊटमध्ये गेली. पेनल्टीच्या पहिल्या प्रयत्नात पुन्हा स्पेन आणि पोर्तुगाल अपयशी ठरले. दुसऱ्या प्रयत्नात दोन्हीकडून एक-एक गोल झाला. तिसऱ्या शुटआऊटमध्ये स्पेनकडून जेराल्ड आणि पोर्तुगालकडून नानी गोल करत मॅच बरोबरीत ठेवली. चौथ्या शुटआऊटमध्ये पोर्तुगालच्या ब्रुनो अल्वेसला गोल करता आला नाही. फेब्रेगेसने स्पेनकडून पाचव्या शुटआऊटमध्ये गोल लगावला आणि स्पेनचा फायनलचा मार्ग मोकळा करुन दिलाय.

 

.