www.24taas.com, लंडन
सायना नेहवाल उपांत्य फेरीत जागतिक पातळीवरील क्रमांक एकची चीनची खेळाडू यिहान वांग हिच्याकडून सरळ दोन सेटमध्ये पराभूत झाली. वँगने सायनाला २१-१३ व २१-१३ अशा सरळ सेटमध्ये सहज हरविले.
सायनाने पहिला सेट १३-२१ ने गमविल्यानंतर दुस-या सेटमध्ये तिने वांगला झुंजवले. दुस-या सेटमध्ये १२-१२ अशी बरोबरी होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात सायनाला ती लय राखता आली नाही. वँगच्या सर्विसपुढे सायना वारंवार चुका करीत होती. त्यामुळे वँगला एक-एक गुण बहाल होत होता. दुसरीकडे, सायनाचा गुणफलक मात्र तसाच होता. अखेर वांगने दुसरा सेटही २१-१३ असा सहज जिंकत सामना खिशात घातला. याचबरोबर चीनने आपल्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक निश्चित केले.
दरम्यान, सायनाचा पराभव झाल्याने भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. तरीही सायना दुस-या सेमीफायनला लाईनअप ( झीन वांग वि. झिरुई ली, दोघीही चीन) मधील पराभूत खेळाडूबरोबर ब्रांझपदकासाठी लढत देईल.