अॅडलेड टेस्ट दुसऱ्या दिवसअखेर इंडिया ६१/२

अॅडलेड टेस्टच्या दुसऱ्या दिवशी आज टीम इंडियाने दिवसअखेर ६१ रन्स करून २ विकेट गमावल्या. गौतम गंभीर ३० आणि सचिन तेंडुलकर १२ रन्सवर खेळत आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या अजूनही ५४३ रन्सने पिछाडीवर आहे.

Updated: Jan 25, 2012, 01:06 PM IST

www.24taas.com, अॅडलेड

 

अॅडलेड टेस्टच्या दुसऱ्या दिवशी आज टीम इंडियाने दिवसअखेर ६१ रन्स करून २ विकेट गमावल्या. गौतम गंभीर ३० आणि सचिन तेंडुलकर १२ रन्सवर खेळत आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या अजूनही ५४३ रन्सने पिछाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला या मॅचमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. तसचं त्यासोबत उद्या सचिन तेंडुलकर महाशतक झळकावणार का ? हे सुद्धा दिसून येईल.

 

मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

 

अॅडलेड टेस्टमध्ये जिथे ऑस्ट्रेलियाने जबरदस्त बॅटींगचा नमुना पेश केला त्याच अॅडलेड टेस्टमध्ये टीम इंडियाचे बॅट्समन पुन्हा एकदा ढेपाळले आहेत फक्त पहिल्या ५० रन्सच्या आतच टीम इंडियाचे दोन महत्त्वाचे फंलदाज तंबूत परतले.  धडाकेबाज वीरेंद्र सेहवाग हा तब्बल १८ रन काढून सिडेलच्या बॉलिंगवर त्यालाच कॅच देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. तर पुन्हा एकदा राहुल द्रविड अपयशी ठरला फक्त १ रन करून तो परत एकदा बोल्ड झाला. त्यानंतर गौतम गंभीर आणि सचिन तेंडुलकर यांनी जास्त पडझड होऊ दिली नाही. गंभीर २५ रन्स आणि सचिन १२ रन्सवर खेळत आहेत.

 

अॅडलेड टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन बॅट्समने टीम इंडियाच्या बॉलिंगची अक्षरश: पिसे काढली. पॉण्टिंग आणि क्लार्क बाद झाल्यानंतर टीम इंडिया बाकीच्या फंलदाजांना झटपट बाद करेल अशी आशा होती, मात्र ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या बॅट्समननी अगदी नांगर टाकून बॅटींग केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ६०४ रन्सवर आपला पहिला डाव घोषित केला. त्यातमोबदल्यात त्यांनी आपले फक्त ७ मोहरे गमावले. इंडियाच्या पहिल्या डावाला प्रारंभ झाला आहे. आता टीम इंडिया काय कमाल करणार आहे याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

ऍडलेडवर दुसऱ्या दिवसाची सुरुवातही कांगारुंच्याच नावावर राहिली. कॅप्टन क्लार्क आणि त्या पाठोपाठ रिकी पॉन्टिंग दोघांनीही डबल सेंच्युरी ठोकल्या. क्लार्कनं आपल्या करिअर मधली दुसरी तर पॉन्टिंगनं करिअरची सहावी डबल सेंच्युरी झळकावली.  क्लार्क २१० रन्सवर उमेश यादवकडून बोल्ड झाला. क्लार्क आणि पॉन्टिंगच्या ३८६ रन्सच्या पार्टनरशिपच्या मदतीनं ऑस्ट्रेलियानं ६०० रन्सचा टप्पा पार केला. त्यानंतर माईक हसी २५ रन्सवर तर पॉन्टिंग २२१ रन्सवर झहीर खानच्या बॉलवर सचिनला कॅच देत आऊट झाला.

 

अॅडलेड टेस्टमध्ये  ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टन मायकेल क्लार्क आणि रिकी पॉन्टिंग यांनी नॉट आऊट डबल सेंच्युरी केली. या दोघांची पार्टनरशिप टीम इंडियाला डोकेदुखी ठरली होती. त्यामुळे टीम इंडिया बॅकफूटवर गेली आहे. ओपनर वॉर्नर, कोवन आणि शॉन मार्श या टॉप तीन बॅट्समनला झटपट आऊट करण्यात टीम इंडियाच्या बॉलर्सना यश आलं. मात्र, त्यानंतर यश आलं नाही.

 

क्लार्क आणि माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगनं टीम इंडियाच्या बॉलर्सला कोणतच यश मिळू दिलं नाही. दोघांनी भारतीय बॉलर्सचा यथेच्छ समाचार घेतला. क्लार्क २१० रन्सवर तर पॉन्टिंग १९८ रन्सवर नॉट आऊट आहेत. टीम इंडियाकडून अश्विननं २ तर झहीरनं एक विकेट घेतली. तर क्लार्क आणि पॉन्टिंगनं ३८५ रन्सची पार्टनरशिप केली आहे.

 

रिकी पॉण्टिंगने पुन्हा एकदा टीम इंडिया विरूद्ध शतक ठोकलं आहे, त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतलं ४१वं शतक ठोकलं आहे. त्याने त्याच्या या संपूर्ण खेळीमध्ये शानदार १२ फोरच्या साह्याने शतकी खेळी केली आहे. तर त्याच सोबत पुन्हा एकदा कॅप्टन्स इनिंग खेळत मायकल क्लार्क याने देखील शतकं काढलं आहे त्याने त्याच्या खेळीत १४ फोर आणि एका षटकाच्या जोरावर शतकं ठोकलं आहे.

 

पहिल्या दिवशी लचं पर्यंत ऑसींनी आपल्या ३ विकेट गमावल्या होत्या. त्यात दोन विकेट आर. अश्विनने घेतली तर एक विकेट झहीर खानने मिळवली. पर्थ टेस्टमध्ये भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या धडाकेबाज डेव्हिड वॉर्नरचा अडसर झहीर खाननं लगेचच दूर केला. त्यानंतर अश्विननं शॉन मार्शचा काटा काढला. वॉर्नर आणि मार्श झटपट तंबूत तर कोवेननं याला देखील अश्विन लक्ष्मणकरवी झेलबाद करीत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कोवेन पर