झी २४ तास वेब टीम, कोलकाता
भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव टी-20 मॅच आज कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर रंगणार आहे. वन-डे सीरिजमध्ये इंग्लिश टीमचा 5-0 नं धुव्वा उडवल्यानंतर आता टी-20 मॅचही जिंकण्यास भारतीय टीम आतूर असणार आहे. तर वन-डे सीरीजमध्य़े फ्लॉप ठरलेली इंग्लिश टीम टी-20 मॅचमध्ये विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.
[caption id="attachment_4039" align="alignleft" width="267" caption="आज टी-20 लढत"][/caption]
इंग्लंडविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये जबरदस्त कामगिरी करत टीम इंडियानं 5-0 नं ही सीरिज जिकंली. धोनी ब्रिगेडच्या सांघिक कामगिरीमुळे भारतीय टीमला ही सीरिज जिंकता आली. आता, कूकच्या टीमविरुद्धची एकमेव टी-20 मॅच जिंकण्यास धोनी अँड कंपनी भर देणार आहे. वन-डे सीरिजमध्ये भारतीय टीम तुफान फॉर्मात होती. त्यामुळे आपला हाच फॉर्म कायम राखण्यास टीम इंडिया प्रयत्न करणार आहे. बॅट्समननी टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. युवा अजिंक्य रहाणेची बॅट या सीरिजमध्ये चांगलीच तळपली. तर मिडल ऑर्डरच्या विराट कोहलीच्या बॅटमधूनही रन्सचा पाऊस पडला. सुरेश रैनानही आपल्या बॅटचा तडाखा इंग्लिश टीमला दिला.
कॅप्टन महेंद्रसिंग धोनीन मॅचविनिंग इनिंग्ज खेळत टीमला विजय मिळवून दिले. त्याला वन-डे सीरिजमध्ये इंग्लिश बॉलर्सला एकदाही आऊट करता आलं नाही. त्य़ामुळे या मॅचमध्य़ेही कॅप्टन धोनी इंग्लिश टीमची डोकेदुखी ठरणार आहे. रॉबिन उथप्पा आणि युसूफ पठाणनं टी-20 मध्ये कमबॅक केलं आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडेही सा-यांचच लक्ष असणार आहे. बॉलर्सही लौकीकाला साजेशी कामगिरी करत आहेत. आर अश्विन आणि रविंद्र जाडेजाची स्पिन बॉलिंगही वन-डे सीरिजमध्ये प्रभावी ठरली होती. त्यामुळे या मॅचमध्येही या दोघांकडून अशाच कामगिरीची अपेक्षा टीमला असणार आहे.
फास्ट बॉलर्सनीही चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे या मॅचमध्ये इंग्लिश बॅटसमनना रोखण्यास भारतीय फास्ट बॉलर्स सज्ज असतील. तर इंग्लिश टीमला काहीच कमाल करता आलेली नाही. जोनाथन ट्रॉटची बॅटच केवळ वन-डे सीरिजमध्ये तळपली होती. असं असलं तरी, टी-20 मॅच जिंकत इंग्लिश टीम दौ-यातील पहिला आणि एकमेव विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर टीम इंडिया आपली विजयी मालिका कायम राखते की, इंग्लिश टीम या विजयी मालिकेला ब्रेक लावते ते पाहण महत्त्वाच ठरणार आहे.
टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन गौतम गंभीर लग्नाच्या बेडीत अडकला. गुडगावमधल्या नताशा जैनसह गंभीरचं लग्न झालं. दिल्लीतल्या वेस्ट एंड ग्रीन फार्म हाऊसमध्ये हा लग्नसोहळा झाला. गंभीरच्या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींची हजेरी लावली.