इंडियाची झुंज आता वेस्टइंडीज संगे,

इंग्लिश आर्मीनंतर आता धोनी ब्रिगेडची लढाई असणार आहे विंडीज टीमशी. रविवारपासून विंडिजविरूद्ध तीन टेस्टची सीरिज सुरू होणार असून दिल्लीतील फिरोजशाह कोटलावर पहिली टेस्ट खेळली जाणार आहे. या सीरिजमध्ये दिग्गज प्लेअर्सना कमबॅक केल्याने टीम इंडियाचं पारडं जड आहे. तर वेस्टइंडिज टीमही धोनी ब्रिगेडला टक्कर द्यायला सज्ज आहे.

Updated: Nov 5, 2011, 03:15 PM IST
झी २४ तास वेब टीम, मुंबई

इंग्लिश आर्मीनंतर आता धोनी ब्रिगेडची लढाई असणार आहे विंडीज टीमशी. रविवारपासून विंडिजविरूद्ध तीन टेस्टची सीरिज सुरू होणार असून दिल्लीतील फिरोजशाह कोटलावर पहिली टेस्ट खेळली जाणार आहे. या सीरिजमध्ये दिग्गज प्लेअर्सना कमबॅक केल्याने टीम इंडियाचं पारडं जड आहे. तर वेस्टइंडिज टीमही धोनी ब्रिगेडला टक्कर द्यायला सज्ज आहे.

इंग्लंडचा मायदेशात धुव्वा उडवल्यानंतर टीम इंडियाची पुढची लढाई रविवारपासून सुरु होते ती कॅरेबियन टीमशी. वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात टीम इंडियाच पारडं जड आहे. सचिन, सेहवाग, युवराजनं टीममध्ये कमबॅक केल्यानं टीम इंडिया बॅटिंग लाईनअप चांगलीच भक्कम झाली. या सीरिजमध्ये सर्वाचं लक्ष असणार आहे मास्टर ब्लास्टरच्या महासेंच्युरीकडे. सचिन या सीरिजमध्ये सेंच्युरींची सेंच्युरी पूर्ण करण्याची शक्यता आहे.

विंडीजविरुद्ध टीम इंडियाच्या फास्ट बॉलिंग ऍटॅकची मदार उमेश यादव आणि वरूण ऍरॉन या युवा बॉलर्सवर असणार आहे. दिल्ली एक्स्प्रेस ईशांत शर्मामुळे भारताच्या फास्ट बॉलिंगला अजून धार मिळेल. भज्जीच्या गैरहेजरीत आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि राहुल शर्मावर फिरकीची जबाबदारी असेल. तर दुसरीकडे वेस्टइंडीजच्या टीमने नुकताच बांग्लादेशला त्यांच्याच भूमीत पराभूत केल्याने त्यांचाही आत्मविश्वास दुणावलाय. ख्रिस गेलच्या गैरहजेरीत विंडिजची भिस्त शिनारायण चंद्रपॉल, डॅरेन ब्राव्हो, रवी रामपॉलवर आणि कॅप्टन डॅरेम सॅमी भिस्त असणार.विंडीजविरुद्धच्या सीरिजमध्ये धोनी ब्रिगेडसमोर मायदेशातील विजयी घौडदौड कायम ठेवण्याचच आव्हान असणार आहे.