खासदार सचिन विरोधात पहिली मॅच- वीरू

सचिनच्‍या खासदारकीवरुन एकीकडे राजकारण कुरघोडी सुरू असताना दिल्‍लीमध्‍ये वीरूने सचिनवर मिश्किल टिप्पणी केली हे. आज दिल्‍ली डेअरडेव्हिल्‍स विरुद्ध मुंबई इंडियन्‍स असा सामना सुरू आहे. या सामन्यापूर्वी भारताचा तडाकेबंद फलंदाज वीरेंद्र सेहवागने ट्विटर जोरदार फटकेबाजी केली आहे.

Updated: Apr 27, 2012, 08:57 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली 

सचिनच्‍या खासदारकीवरुन एकीकडे राजकारण कुरघोडी सुरू असताना दिल्‍लीमध्‍ये वीरूने सचिनवर मिश्किल टिप्पणी केली हे. आज दिल्‍ली डेअरडेव्हिल्‍स विरुद्ध मुंबई इंडियन्‍स असा सामना सुरू आहे. या सामन्यापूर्वी भारताचा तडाकेबंद फलंदाज वीरेंद्र सेहवागने ट्विटर जोरदार फटकेबाजी केली आहे.

 

 

आयपीएलमध्ये आज पहिल्यांदाच मी राज्यसभेच्या सभासदाविरोधात क्रिकेट मॅच खेळणार आहे, असे ट्विट वीरुने केले आहे. वीरेंद्र सहवागने सचिनच्या खासदारकीबद्दल ही मिश्किल प्रतिक्रिया ट्विटरवर व्यक्त केलीय.

 

 

राज्यसभेच्या सभासदाविरोधात मी पहिल्यांदाच क्रिकेट मॅच खेळणार आहे. आशा करतो की, हवामानाने  चांगली साथ दिली, तर संपूर्ण मॅच खेळू. असेही सेहवागने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Tags: