पुढील दोन टेस्टसाठी टीम इंडिया जाहीर

टीम इंडियाची पुढील दोन टेस्ट साठी आज निवड समितीने भारतीय संघ जाहीर केला, आणि त्यात काहीच बदल झालेला नाही. त्यामुळे हरभजन सिंगला अजूनही संघात येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

Updated: Nov 10, 2011, 03:22 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

टीम इंडियाची पुढील दोन टेस्ट साठी आज निवड समितीने भारतीय संघ जाहीर केला, आणि त्यात काहीच बदल झालेला नाही. त्यामुळे हरभजन सिंगला अजूनही संघात येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

विडिंजविरूद्ध कोटला टेस्टमध्ये यंग ब्रिगेडने केलेल्या दमदार कामगिरीवर खुष होऊन, भारतीय निवड समितीने दिल्ली येथे झालेल्या मिटींगमध्ये कोलकाता येथे होणाऱ्या दुसऱ्या टेस्टकरता टीममध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. आर. अश्विन आणि प्रग्यान ओझा यांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे पुन्हा एकदा अनुभवी भारतीय ऑफ स्पिनर हरभजन सिंगला दुसऱ्या टेस्टमध्येही संधी मिळाली नाही. निवड समितीने यंगस्टर्सवरच विश्वास ठेवत भज्जीला वगळण्याचा निर्णय घेतला. विंडीजविरूद्धच्या दुसऱ्या टेस्टला १४ नोव्हेंबरपासून ईडन गार्डन्स येथे सुरूवात होणार असून. तीन टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये भारताने दिल्ली टेस्ट जिंकून १-० ने आघाडी घेतली आहे.