झी २४ तास वेब टीम, मुंबई
मुंबई टेस्टच्या तिसऱ्या दिवसअखेर भारतानं ३ विकेट् गमावून २८१ रन्स केले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ६७ रन्सवर तर व्हीव्हीएस लक्ष्मण ३२ रन्सवर खेळत आहे. तत्पूर्वी वेस्ट इंडिजची पहिली इनिंग ५९० रन्सवर संपली. त्यानंतर गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवागनं भारताला ६७ रन्सची धडाक्यात ओपनिंग दिली. सेहवाग ३७ रन्सवर आऊट झाल्यानंतर द्रविड आणि गंभीरनं भारताला १०० रन्सचा टप्पा पार करून दिला.
गंभीरला रामपॉलनं ५५ रन्सवर आऊट केलं. तर द्रविडही टेस्टमधील १३ हजार रन्सचा टप्पा पार केल्यानंतर ८२ रन्सवर सॅम्युअल्सचा शिकार ठरला. त्यानंतर सचिन आणि लक्ष्मणन कॅरेबियन बॉलर्सला कोणतचं यश मिळू दिलं नाही. दिवसअखेर सचिन ६७ रन्सवर खेळत होता. आता मुंबई टेस्टच्या चौथ्या दिवशी सचिन महासेंच्युरी झळकावणार का याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'द वॉल' अर्थात राहुल द्रविडनं टेस्ट करिअरमध्ये १३ हजार रन्सचा टप्पा पार केला. त्यानं वेस्ट इंडिजविरुद्ध वानखेडे स्टेडियवर हा मैलाचा दगड गाठला. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेट विश्वातील दुसरा क्रिकेटर ठरला. द्रविडच्यापुढे आता केवळ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. सचिनचे १८४ टेस्टमध्ये १५ हजार ८६ रन्स आहे. तर द्रविडनं १३ हजार रन्सचा टप्पा १६० टेस्ट मॅचेसमध्ये गाठला.