भारतीयांच्या नजरा, लंकेचा २३२मध्ये खुर्दा!

सर्व भारतीयांच्या नजरा लागून राहिलेल्या आशिया कप क्रिकेटच्या आजच्या शेवटच्या लिग सामन्यात बांग्लादेशने श्रीलंकेला २३२ धावांत गुंडाळलं आहे. आघाडीचे फलंदाज झटपट परतल्यानंतर चमारा कपुगेडरा आणि उपुल थरंगा यांच्या सावध पवित्र्यानंतर लंकेला २३२ चा पल्ला गाठता आला.

Updated: Mar 20, 2012, 06:09 PM IST

www.24taas.com, मीरपूर

सर्व भारतीयांच्या नजरा लागून राहिलेल्या आशिया कप क्रिकेटच्या आजच्या शेवटच्या लिग सामन्यात बांग्लादेशने श्रीलंकेला २३२ धावांत गुंडाळलं आहे. आघाडीचे फलंदाज झटपट परतल्यानंतर चमारा कपुगेडरा आणि उपुल थरंगा यांच्या सावध पवित्र्यानंतर लंकेला  २३२ चा पल्ला गाठता आला.

कपुगेडराने ६२ धावा केल्या, तर थरंगाने ४८ धावा केल्या. या दोघांना लहिरू थिरिमन्नेने ४८ धावा करत चांगली साथ दिली. बांगलादेशकडून नजमुल हुसैन याने भेदक बॉलिंग करत ३२ धावांत तीन विकेट घेतल्या. त्यामुळे श्रीलंकेचा डाव ४९.५ ओव्हरमध्ये २३२ धावांत आटोपला.

अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी बांगलादेशला ही मॅच जिंकण गरजेचं आहे. तर दुसरीकडे मालिकेतून बाहेर पडलेल्या श्रीलंकेने ही मॅच जिंकली तरच भारत फायनलमध्ये पोहचू शकतो. त्यामुळं सर्व भारतीय श्रीलंकेसाठी प्रार्थना करत आहेत.

मीरपूर येथे एशिया कपसाठी सुरू असलेल्या  श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात सुरू असलेल्या वन-डे मॅचमध्ये बांग्लादेशने पहिले टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. आज बांग्लादेश आणि श्रीलंका ही भारतासाठी महत्त्वाची आहे, जर का आज बांग्लादेश पराभूत झाला तरच भारत एशिया कपच्या फायनलमध्ये पोहचणार आहे. त्यामुळे श्रीलंकेने आज बांग्लादेशला हरवणं गरजेचं आहे.