मिडल ऑर्डर नाही झाली क्लिक

मेलबर्न टेस्टमध्ये भारताला मानहानिकारक पराभव सहन करावा लागला. भारताची बॅटिंग या मॅचमध्ये पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात अनुभवी समजली जाणारी बॅटिंग लाईन अप भारताला पराभवापासून वाचवू शकली नाही.

Updated: Dec 29, 2011, 11:20 PM IST

झी २४ तास वेब टीम, मेलबर्न

 

मेलबर्न टेस्टमध्ये भारताला मानहानिकारक पराभव सहन करावा लागला. भारताची बॅटिंग या मॅचमध्ये पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात अनुभवी समजली जाणारी बॅटिंग लाईन अप भारताला पराभवापासून वाचवू शकली नाही. सचिन तेंडुलकरपासून ते विराट कोहलीपर्यंत सारेच मिडल ऑर्डर बॅट्समन अपयशी ठरले.

 

जगातील सर्वात अनुभवी बॅट्समन्सनी  या मॅचमध्ये घोर निराशा केली. एकाही बॅट्समनला मैदानावर जबाबदारीनं खेळ करता आला नाही. सचिन तेंडुलकरला चांगली सुरुवात मिळवूनही एका खराब शॉर्टवर आऊट झाला. राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण ही भारताची मिडल ऑर्डर सुपरहिट जोडी टीम इंडियाच तारु सावरु शकली नाही. लक्ष्मणनं तर दोन्ही इनिंगमध्ये निराशा केली. मिडल ऑर्डर क्लिक झाली नाही. आणि त्यामुळेच भारताला पराभवाच तोंड पाहाव लागलं.

 

राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरनं पहिल्या इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी ठोकली होती. मात्र, दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांना आपल्या टीमला विजय मिळवून देता आली नाही. कॅप्टन धोनीचा मिडास टचही या मॅचला मिळाला नाही. तर युवा विराट कोहलीही टीमच्या अपेक्षा पूर्ण करु शकला नव्हता. प्रॅक्टिस मॅचमध्ये चमकलेल्या विराटला काहीच कमाल करता आली नाही. मिडल ऑर्डरचे हे दिग्गज बॅट्समन मेलबर्नमध्ये भारताला तिसऱ्यांदा विजय मिळवून देऊ शकले नाही. ऑल टाईम हिट ठरत आलेली मिडल ऑर्डर फ्लॉप ठरल्यानं भारताच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. मिडल ऑर्डरची कामगिरी अशीच खराब झाली तर भारताचा ऑस्ट्रेलियाच्या भूमीमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्याच स्वप्न राहणार आहे.