सचिनचा खेळ, खासदारकीचा बसणार मेळ?

मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर आता लवकरच 'खासदार सचिन रमेश तेंडुलकर' म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सचिन तेंडुलकर आज संसदेत खासदारकीची शपथ घेण्याची शक्यता आहे.

Updated: Apr 27, 2012, 11:58 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर आता लवकरच 'खासदार सचिन रमेश तेंडुलकर' म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सचिन तेंडुलकर आज संसदेत खासदारकीची शपथ घेण्याची शक्यता आहे. सचिन तेंडूलकरला राज्यसभेचे सदस्यत्व देण्यासंबंधी पंतप्रधान कार्यालयाने गृहमंत्रालयाला पत्र पाठवले होते. यावर राष्ट्रपतींचीही मोहर उमटली.

 

सचिनबरोबरच ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आणि उद्योगपती  अनु आघा यांच्या नावाचीही शिफारस करण्यात आली होती. रेखानेही खासदारकी स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सचिन तेंडुलकरने गुरूवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सचिनने खासदारकीसाठी आपला होकार दिल्यानंतर सरकारकडे तशी शिफारस करण्यात आली. ज्याच्यावर राष्ट्रपतींनी आपली मोहोर उमटवली.

 

तर दुसरीकडे सचिनच्या या निर्णयावर शिवसेना चांगलीच नाराज आहे. सचिननं काँग्रेसपासून सावध रहावं असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. काल सचिननं सोनिया गांधींची भेट घेतली होती. काँग्रेसनं दिलेली राज्यसभेच्या खासदारीकीची ऑफर सचिननं स्वीकारली आहे. यात नवं राजकारण होत आहे. असा शिवसेनेचं म्हणणं आहे.