सचिन, काँग्रेसपासून सावधान! - शिवसेना

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या खासदारकीवर शिवसेना नाराज झाली आहे. सचिननं काँग्रेसपासून सावध रहावं असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. काल सचिननं सोनिया गांधींची भेट घेतली होती.

Updated: Apr 27, 2012, 11:36 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या खासदारकीवर शिवसेना नाराज झाली आहे. सचिननं काँग्रेसपासून सावध रहावं असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. काल सचिननं सोनिया गांधींची भेट घेतली होती. काँग्रेसनं दिलेली राज्यसभेच्या खासदारीकीची ऑफर सचिननं स्वीकारली आहे. यात नवं राजकारण होत आहे. काँग्रेस पार्टीचा नक्की हेतू काय? सचिन आजही मैदानात खेळात आहे. त्यामुळे त्याने संसदेत जाणं योग्य आहे का? काँग्रेस पक्ष  हा अनेक अडचणीने घेरला गेला आहे, त्यामुळे काँग्रेसची ही नवी खेळी असण्याची शक्यता आहे. असं सजंय राऊत यांनी स्पष्ट केलं

 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या खासदारकिच्या निर्णयावर आता हळूहळू सगळ्याच स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यात अनेकांनी बरीच वादग्रस्त विधाने देखील केली आहे. सचिनचा हा निर्णय चूक आहे की, अचूक आहे इथपासूनच सुरवात होत आहे. विक्रमादित्य मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खासदारकीची ऑफर स्वीकारल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. सचिन तेंडूलकरला राज्यसभेचे सदस्यत्व देण्यासंबंधी पंतप्रधान कार्यालयाने गृहमंत्रालयाला पत्र पाठवले होते. यावर राष्ट्रपतींचीही मोहर उमटली. सचिनबरोबरच ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आणि उद्योगपती  अनु आघा यांच्या नावाचीही शिफारस करण्यात आली होती. रेखानेही खासदारकी स्वीकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

सचिन आता संसदेच्या ‘खेळपट्टीवर’ अवतरणार आहे. सचिन तेंडुलकरसह ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आणि उद्योगपती अनू आगा हेही आता राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त सदस्य म्हणून दिसणार आहेत. सचिन, रेखा आणि अनू आगा यांना राज्यसभेवर नामनियुक्त करण्याची शिफारस गुरुवारी काँग्रेसतर्फे करण्यात आली. त्यानंतर लगेचच राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्यास मंजुरी दिली.