IPL महामुकाबला, कोण मारणार बाजी?

चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये आयपीएलच्या विजेतेपदासाठी आज महामुकाबला रंगणार आहे. आता धोनी विजयाची हॅटट्रिक साधतो की किंग खानची केकेआर पहिलं-वहिलं विजेतपद पटकावून इतिहास रचतो, याकडेच साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Updated: May 27, 2012, 09:06 AM IST

 www.24taas.com, बंगळुरू

 

चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये आयपीएलच्या विजेतेपदासाठी आज महामुकाबला रंगणार आहे. आता धोनी विजयाची हॅटट्रिक साधतो की किंग खानची केकेआर पहिलं-वहिलं विजेतपद पटकावून इतिहास रचतो, याकडेच साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये आयपीएल फायच्या विजेतेपदासाठी अखेरचा मुकाबला रंगणार आहे.

 

सुपर संडेचा हा सुपर मुकाबला चेन्नईतील चेपॉकवर रंगणार आहे. आता या अखेरच्या लढतीमध्ये कोण बाजी मारत आणि विजेतपदावर आपलं नाव कोरतं याकडेच तमाम क्रिकेट प्रेमींच लक्ष लागून राहिलं आहे. सलग दोनवेळा आयपीएलच विजेतेपद पटाकवलेल्या धोनीच्या चेन्नई सेनेला विजयाची हॅटट्रिक करण्याची ही नामी संधी आहे. तर दुसरीकडे प्रथमच फायनलमध्ये धडक मारणाऱ्या कोलकात्याला विजेतपद पटकावून इतिहास रचण्याची संधी प्रथमच चालून आली आहे. मुंबई आणि दिल्लीसारख्या मातब्बर टीमला अक्षरक्ष: धूळ चारणाऱ्या चेन्नईला आता फायनलमध्ये कोलकात्याला नामोहरण करणं खरंतर फारसं अवघड नाही. दिल्लीविरूद्ध मुरली विजयचा झंझावात पाहता त्याला रोखणं केकेआरसमोर मोठ आव्हान असणार आहे.

 

याशिवाय माइकल हसी, ड्वेन ब्राव्हो, महेंद्र सिंग धोनी, सुरेश रैना आणि एस. बद्रीनाथ हे बॅटिंग लाईन अप सांभाळतील. तर आर. अश्विनच्या फिरकीचा केकेआरला खरा धोका असेल. याचबरोबर बेन हिलफेनहॉस, ऍल्बी मॉर्केल, ड्वेन ब्राव्हो आणि रवींद्र जाडेजा अशी बॉलिंगची फळी चेन्नईकडे आहे. तर पहिल्या तिन्ही सीझनमध्ये लीग राऊंडमध्येच आव्हान संपुष्टात आलेल्या केकेआरने प्रथमच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. कॅप्टन गौतम गंभीर, ब्रँडन मॅकल्लम, जॅक कॅलिस, मनोज तिवारी आणि युसूफ पठाण असे तडाखेबंद बॅट्समन केकेआरकडे आहेत. तर सुनिल नरेन हा स्पिनर चेन्नईसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो.

 

याशिवाय लक्ष्मीपती बालाजी, शाकिल अल हसन आणि जॅक कॅलिसवरही बॉलिंगची धुरा असेल. आता या महामुकाबल्यामध्ये चेन्नई विजयाची हॅटट्रिक साधते का कोलकाता पहिल-वहिला विजय मिळवून इतिहास घडवते हे पाहणं रंगतदार ठरणार आहे.