www.24taas.com, रांची
हैदराबादच्या दिलसुखनगरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी पहिली अटक झाली आहे. झारखंडच्या रांचीमधून पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केलीय. मंजर इमाम असं या इसमाचं नाव आहे.
मंजर इमाम याला रांचीजवळच्या बारिटू भागातून अटक करण्यात आली. २१ फेब्रुवारीला हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. यात १६ जणांचा मृत्यू झाला होता. या स्फोटाचे धागेदोरे शोधण्यासाठी तपास यंत्रणांची पथकं देशभरात तपास करीत होती. तपास यंत्रणांच्या हाती इमामच्या माध्यमातून पहिलं यश हाती लागलय.
इमाम अहमदाबाद बॉम्बिस्फोेटप्रकरणातही पोलिसांना हवा होता. रांचीचे पोलीस आयुक्त विपुल शुक्लाा यांनी अटकेबाबत माहिती दिली. परंतू, अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. राष्ट्री य तपास संस्थाअ आणि पोलिसांच्या् संयुक्त पथकाने त्यािला अटक केलीय. हैदराबाद बॉम्बषस्फो्टप्रकरणी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेवर संशयाची सुई आहे. या संघटनेच्या् अनेक दहशतवाद्यांचा झारखंडशी संबंध आलेला आहे.
हैदराबाद स्फोधटामध्येर तीन दहशतवाद्यांची नावं समोर आली आहेत. त्यारपैकीच एक आरोपी आहे मंझर इमाम. इमामला अबू हनीफा या नावाने संघटनेत ओळखले जाते. अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था दोन वर्षांपासून इमामच्या शोधात होती.