`पृथ्वी` मिसाईल रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे `दादा`स्त्र

आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. थोड्याच वेळात त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.

Updated: Dec 7, 2012, 08:57 AM IST

www.24taas.com, मुंबई
आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. थोड्याच वेळात त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. अवघ्या ७२ दिवसांच्या राजकीय विजनवासानंतर हिवाळी अधिवेशनापूर्वी कमबॅक अजित दादांचं कमबॅक होतंय. त्यामुळे `पृथ्वी` मिसाईल रोखण्यासाठी राष्ट्रवादीनं `दादा`स्त्र वापरल्याची चर्चा सुरू आहे.
अजित पवारांचा आज शपथविधी होणार आहे. याबाबतचं सर्वप्रथम वृत्त झी २४ तासनं दिलं होतं. राष्ट्रवादीनं अजितदादांच्या समावेशाबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्रही पाठवले आहे. आज सकाळी ९.३० वाजता राजभवनात अजितदादांचा उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होणार आहे. विशेष म्हणजे अर्थ आणि उर्जा ही पूर्वीचीच खाती त्यांना मिळणार आहेत.
काँग्रेसमध्ये मात्र कोणताही बदल होणार नाही. सिंचनाची श्वेतपत्रिका मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आली. या श्वेतपत्रिकेत अजित पवारांना क्लीन चिट मिळाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांनी मंत्रिमंडळात परत यावे अशी मागणी केली होती. त्याचवेळेस त्यांचा मंत्रिमंडळात पुनरागमनाचा मार्ग प्रशस्त झाला होता. राष्टवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त करत याचं स्वागत केलंय.