पुल देशपांडे म्हणजे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व. ८ नोव्हेंबर ही पुलंची जयंती आणि म्हणूनच गोरेगावकर पुल प्रेमींनी पुलोत्सवाचं आयोजन केलं आहे. ४ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत हा पुल उत्सव साजरा करण्यात येत आहे. यात पुलं च्या गाजलेल्या नाटकांचं सादरीकरण, पुलंच्या समग्र जीवनपटचा आढावा घेणारं प्रदर्शन, पुलं वर आधारित चर्चासत्र यांचा समावेश आहे.
या उत्सवाचं उद्धाटन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. पुलत्सोवात नानाने पु. लं च्या अनेक आठवणींना उजाळा दिला. या आठवणी सांगताना नाना अक्षरश: गहिवरला. तसं नानाच्या डोळ्यात क्वचितच पाणी पाहायला मिळतं. मात्र पु लंच्या आठवणींमध्ये रमताना नानाचे डोळे अक्षरश: पाणावले. पुलंची 'रावसाहेब' ही व्यक्तिरेखा आपल्याला करायला आवडेल असं प्राजळपणे नानानं यावेळी सांगितलं.