संगीतकार अनिल मोहिले यांचे निधन

ज्येष्ठ संगीतसंयोजक अनिल मोहिले यांचे मुंबईत ७१ व्या वर्षी निधन झाले. व़ध्दापकाळाने राहत्याघरी त्यांचे निधन झाले. अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल यांच्या जोडीनं संगीतबद्ध केलेली अनेक गीतं आजही आपल्या समरणात आहेत. त्यानंतर अनिलजींनी स्वतंत्रपणे अनेक चित्रपटांना संगीत दिलं आहे. मोहिले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

Updated: Feb 1, 2012, 12:33 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

ज्येष्ठ संगीतकार अनिल मोहिले यांचे व़ध्दापकाळाने मुंबईत ओशिवरा येथील राहत्याघरी निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल यांच्या जोडीनं संगीतबद्ध केलेली अनेक गीतं आजही सर्वांच्या समरणात आहेत. त्यानंतर अनिलजींनी स्वतंत्रपणे अनेक चित्रपटांना संगीत दिलं आहे. मोहिले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

 

१९६०च्या दशकात यशवंत देव यांनी सूचवल्यानुसार अनिलजींना आकाशवाणीचं कंत्राट मिळालं. त्या वेळी ते रूपारेल कॉलेजमध्ये शिकत होते. इथं त्यांना गाणा-या कलावंताबरोबर व्हायोलिन फॉलो करावं लागलं. हा त्यांच्या आयुष्यातला टर्निग पॉइंट होता. इथून ते शास्त्रीय संगीतापासून भावसंगीताकडे वळले. तिथंच त्यांना संगीत संयोजनासाठी शिवकुमार पुंजाणी यांच्या रूपाने गुरू भेटले. नोटेशन वाचून वाजवणं हा प्रकार त्यांना इथे शिकायला मिळाला. आकाशवाणीवर ख्यातकीर्त संगीतकार श्रीनिवास खळे यांची ओळख झाली. खळ्यांबरोबर काम करताना नोटेशन लिहिणं, चालीमधल्या जागा गीताच्या चालीला अनुरूप अशा धूनांनी भरणं यासाठी लागणारं ज्ञान अनिलजींना खळ्यांकडून मिळालं.

 

 

तरंगवाद्याचं बाळकडू त्यांना वडिलांकडून मिळालं होतं. ते स्वत: बुलबुल तरंग वाजवायचे. ते मेंडोलिनही वाजवायचे. स्वत:ची नोकरी सांभाळून त्यांनी ही आवड जोपासली होती.  वयाच्या सातव्या वर्षी आकाशवाणी मुंबई केंद्रावर त्यांचा ‘गंमत जंमत’ या मुलांच्या कार्यक्रमात एकल तबलावादनाचा कार्यक्रम सादर झाला होता. भारतीय भाव किंवा चित्रपट संगीतात चालींना उठाव प्राप्त करून देण्यासाठी जे संगीत संयोजन लागतं, त्यासाठी शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, नाटय़संगीत आणि आधुनिक संगीत येणं आणि कळणं हे फार आवश्यक आहे, असं अनिलजी अनुभवावरून सांगत असत.  अनिलजींवर लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतल्या प्यारेलाल शर्मा, शंकर-जयकिशन यांचे म्युझिक अरेंजर सॅबेस्टियन, कल्याणजी-आनंदजी यांचे अरेंजर बाळ पार्टे आणि मदनमोहन यांचे अरेंजर सोनिक मास्तर यांचा प्रभाव होता.

 

 

अनिल मोहिलेंकडे प्रचंड ऊर्जा होती. लतादीदींच्या प्रत्येक कार्यक्रमात तेच संगीत संयोजक म्हणून अनेक वादकांना मार्गदर्शन करायचे. अनिलजींच्या संगीत संयोजनामुळे अनेक गीतं अमर झाली आहेत. एखादा मंत्र म्हणताना त्याच्या नादाचं गुंजन ही संगीत संयोजनाची पहिली पायरीच आहे, असं अनिल मोहिले सांगायचे. सगळ्या संगीकारांकडून चांगलं ते टिपून घेण्याचा अनिलजींचा हातखंडा होता.

 

संगीत दिलेले काही चित्रपट

कयामत से कयामत तक, लेकीन, शराबी, डॉन, थोडीसी बेवफाई, अभिमान या सारख्या ८६ हिंदी चित्रपटांचं त्यांनी संयोजन केलं होतं. शुभमंगल सावधान, झपाटलेला, दे दणादण, थरथराट, धडाकेबाज  आदी मराठी चित्रपटांचेही त्यांनी संगीतसंयोजन केलं होतं.

 

[jwplayer mediaid="39159"]