दिनानाथ मंगेशकर पुरस्कारांची घोषणा

कला आणि साहित्याच्या क्षेत्रात मानाच्या समजला जाणारा दिनानाथ मंगेशकर पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन, आणि संगीतकार पंढरीनाथ कोल्हापूरे यांना जाहीर झालाय.

Updated: Apr 13, 2014, 11:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कला आणि साहित्याच्या क्षेत्रात मानाच्या समजला जाणारा दिनानाथ मंगेशकर पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन, आणि संगीतकार पंढरीनाथ कोल्हापूरे यांना जाहीर झालाय.
२४ एप्रिलला पुरस्कार वितरण सोहळा मुंबईत होणार आहे.
सामाजिक कार्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालाय. तर आनंदमयी पुरस्कार खरे वाचनमंदिर या संस्थेला देण्यात आलाय.
साहित्य क्षेत्रातल्या कामगिरीसाठी आनंद यादव यांना तर सिनेक्षेत्रातल्या कार्यासाठी ऋषी कपूर यांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.